Lip Care Tips : लिपस्टिक लावल्याने सौंदर्य खुलले जाते. आजकाल मॅट लिपस्टिकचा ट्रेन्ड वाढत चालला आहे. अशातच मॅट लिपस्टिक दीर्घकाळ ओठांवर राहिल्यास ओठ कोरडे होण्याची समस्या उद्भवू लागते. मॅट लिपस्टिक फिनिश लुक देण्यासह लॉन्ग लास्टिंगही असते. पण मॅट लिपस्टिक ओठांवरुन काढणे फार कठीण काम असते. ही लिपस्टिक काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर, पेट्रोलियम जेली, क्लिंजिंग ऑइल, एक्सफोलिएटिंग स्क्रब अथवा फेशियल क्लिंजरचा वापर करावा लागतो. पुढील काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने ओठांवरील मॅट लिपस्टिक सहज काढू शकता.
स्टेप-1 क्रिम बेस्ड क्लिंजर
ओठांवरील मॅट लिपस्टिक काढण्यासाठी पाणी किंवा ओलसर वाइपचा वापर करण्याएवजी क्यू-टिपला क्रिम किंवा वॉटर बेस्ड क्लिंजरमध्ये बुडवून ठेवा. यानंतर ओठांवर ते लावा. अशातच ओठांवरील लिपस्टिक निघून जाण्यास मदत होईल.
स्टेप-2 DIY एक्सफोलिएटर
क्लिंजरचा वापर करुनही ओठांवरील मॅट लिपस्टिक जात नसल्यास मध आणि ब्राउन शुगर स्क्रबचा वापर एक्सफोलिएटर म्हणून करु शकता. माइल्ड एक्सफोलिएंट डेड त्वचा हटवण्यासह त्वचा मऊसर होण्यास मदत करते. ओठांना एक्सफोलिएट करताना ओळ गरम पाण्याने ओलसर करुन घ्या. यावर एक्सफोलिएटर थोड्या प्रमाणात लावा. यानंतर गरम पाण्याने पुन्हा एक्सफोलिएटर स्वच्छ धुवा.
स्टेप-3 क्रिमी बाम लावा
मेकअप हटवण्यासाठी क्लिंजर मिळत नसल्यास ओठांवर क्रिमी बाम लावून ठेवा. यानंतर कोमट गरम पाण्यात भिजवलेला कापड घेऊन त्याने ओठांवरील मॅट लिपस्टिक काढण्याचा प्रयत्न करा. लिपस्टिकचा रंग जात नसल्यास नारळाचे तेल, जोजोबा ऑइल अथवा बदामाच्या तेलाचाही वापर करू शकता. (Lip Care Tips)
स्टेप-4 माइसेलर क्लिंजिंग वॉटर
काही मॅट लिपस्टिक ओठांवर राहतात. यासाठी माइसेलर क्लिंजिंग वॉटरचा वार करु शकता. तरीही ओठांवर लिपस्टिकचा डाग राहिला असल्यास ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. यानंतर ओठांवर हाइड्रेटिंग लिप बाप नक्की लावा.
