सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात गणेशोत्सवामुळे जल्लोषाच वातावरण आहे, आणि आता बाप्पांना निरोप द्यायची वेळ सुद्धा जवळ आली आहे. बाप्पांना निरोप द्यायच्या काही दिवसांआधीच कर्नाटक मधून सोशल मीडियावर गणपती बाप्पांचा एक फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये गणपती बाप्पा पोलिस वॅन मध्ये बसलेले दिसत आहेत. कर्नाटक मध्ये काही दिवसांपूर्वी विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर सोशल मिडियावर बाप्पांचा हा फोटो आणि काही व्हिडिओ वायरल झाले. काही लोकांनी असा आरोप केला की विसर्जन मिरवणुकीवर दगड फेकनाऱ्यांविरोधात कारवाई न करता कर्नाटक पोलिसांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीलाच ताब्यात घेतल. शिवाय कर्नाटक सरकारने गणेश पूजेवर बंदी आणली आहे असा ही आरोप होतं होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या. या फोटो मागचं सत्य काय? कर्नाटकमध्ये नेमकं काय झालं?
जाणून घेऊया. (Karnataka)
तर झालं काय कर्नाटकमधील मांड्या जिल्ह्यातील नागमंगला शहरात ११ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. बदरिकोप्पलू गावातील युवकांनी ही गणपती विसर्जनाची मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक जेव्हा नागमंगला शहराच्या मुख्य रस्त्यावरून जात होती. तेव्हा रस्त्यामध्ये असेलेल्या एका मशिदीजवळ या मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामुळे दोन गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. वेगवेगळ्या धर्मातल्या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दोन गटांच्या हाणामारीत मोठा हिंसाचार झाल्याचं सोमोरं आलं. (Karnataka)
त्यानंतर काही लोकांनी शहरातल्या रंग, बाइक शोरूम आणि कपड्यांच्या दुकानांना आग लावली. शिवाय रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना देखील आग लावण्यात आली. त्यामध्ये ही दुकानं आणि गाड्या जळून खाक झाल्या. या जाळपोळीमुळे तणाव आणखी वाढला. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा केला आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्याशिवाय पोलिसांनी कलम १४४ सुद्धा लागू केला आहे. ज्यामुळे लोकांना एकत्र येण्यापासून रोखता येईल आणि जमाव एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण त्या आधी संतप्त झालेल्या जमावाने पोलिस स्टेशनमध्ये आंदोलन केलं. गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक आणि हिंसाचार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी त्यावेळी त्यांनी वेळी केली. तरी पोलिसांनी या प्रकरणात ५२ जणांना अटक केली आहे. (Karnataka)
==============
हे देखील वाचा : अनंत व्रत माहिती, पूजा विधी आणि महत्व
===============
मग गणपती बाप्पांच्या व्हायरल फोटोच सत्य काय? तर मांड्या जिल्ह्यात झालेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक घटनेच्या निषेधार्त १३ सप्टेंबर रोजी बंगळुरूच्या टाऊन हॉलमध्ये जमले. टाऊन हॉल येथे आंदोलन करण्यास परवानगी नसल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक झाल्यानंतर तिथे आणखी काही लोकं जमली त्यांनी गणपती बाप्पांची १ फुट उंच मूर्ती सुद्धा आणली. विनापरवानगी आंदोलन करण्यासाठी आलेल्या या लोकांना घेण्यासाठी पोलिस आले असता एका पोलिसकर्मचाऱ्याने गणपतीची मूर्ती उचलून पोलिस व्हॅनमध्ये ठेवली. गणेश मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून पोलिसांनी ती मूर्ती वॅनमध्ये ठेवली. तरी सोशल मीडियावर या फोटोला धार्मिक हिंसाचाराशी जोडलं गेलं. गणपती विसर्जन मिरवणुकीवर झालेली दगडफेक ही अत्यंत चुकीची घटना आहे. सूरतमध्ये गणपती बसवलेल्या मंडपावर दगडफेक झाली होती. अशीच घटना लखनऊ मध्ये सुद्धा घडली होती. धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आणि गणेशोत्सवासारख्या आनंदमय सणांना गालबोट लावणाऱ्या आशा समाजकंटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. (Karnataka)