Home » हमजाची दहशत आणि पुन्हा अमेरिकेवर हल्ल्याची छाया

हमजाची दहशत आणि पुन्हा अमेरिकेवर हल्ल्याची छाया

by Team Gajawaja
0 comment
Hamza
Share

अल कायदा नावाच्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेला ओसामा बीन लादेन याचे नाव 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानं कुप्रसिद्ध झालं. जगातील अनेक देशांमधील दहशतवादी कारवायांमागे ओसामाची संघटना अलकायदा दोषी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अमेरिकेनं आपल्या या दुष्मनाला संपवण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले. 9-11 च्या हल्ल्यानंतर दहा वर्षांनी अमेरिकेचा हा बदला पूर्ण झाला. 2 मे 2011 रोजी पाकिस्तानातील अबोटाबाद शहरात अमेरिकेच्या लष्करी कारवाईत ओसामा मारला गेला. अमेरिकेनं त्याला फक्त मारलं नाही तर त्याचा मृतदेह एका पांढऱ्या चादरीत गुंडाळून, अरबी समुद्रात दफनही केला. (Hamza)

ओसामासोबत त्याचा मुलगा आणि पत्नीही मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा विजयोत्सव साजरा करतांना ओसामाच्या मुलाचे छायाचित्र पुढे आले आणि एकच खळबळ उडाली आहे. ओसामाचा मुलगा हमजा हा जिवंत असून आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून कट्टर दहशतवादी झाला आहे. शिवाय त्यानं अल कायदा या दहशतवादी संघटनेला नवीन रुप दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याच्या या सर्व कारवायांना पाकिस्तानचा पाठिंबा असून हमजा लवकरच आपल्या वडिलांप्रमाणे अमेरिकेवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याचीही बातमी पुढे आली आहे. ही बातमी आल्यावर अमेरिकन सुरक्षा एजन्सीमध्ये खळबळ उडाली आहे. कारण ज्या हमजाला मृत समजण्यात आले होते, त्याला एवढी वर्ष कुठे आणि कोणी लपवून ठेवले, हा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. (Hamza)

अमेरिकेवर झालेला 9/11 दहशतवादी हल्ला कोणीही विसरु शकत नाही. या हल्ल्याला 23 वर्ष झाल्यावर अमेरिकेला पुन्हा अशाच हल्ल्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी दिली आहे, हमजा ओसामा बीन लादेन याने. म्हणजेच ओसामाच्या मुलानं. ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा जिवंत असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले आहे. हा हमजा, अमेरिकेच्या कारवाईत मारला गेल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्यातून तो आश्चर्यकारक रित्या वाचला आहे. हमजा जिवंत असून तो आता अफगाणिस्तानमध्ये अल कायदाचे नेटवर्क स्थापन करून पाश्चात्य देशांवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती आल्यानं अमेरिकेसह युरोपमध्ये सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत. हा हमजा ओसामा बीन लादेन जगासमोर आला तोही एका नाट्यमय प्रसंगातून. कारण 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा वर्धापनदिन नुकताच अल कायदानं साजरा केला. हे करत असतांना हमजानं ट्विनस टॉवरच्या आकाराचा केक कापून आपल्या वडिलांच्या साहसाबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांचा हाच कित्ता पुढे चालवण्याची शपथ घेतली. (Hamza)

अल-कायदा 9/11 सारख्या मोठ्या हल्ल्याची तयारी करत असून त्याचे सर्व नेतृत्व हमजाकडे आहे. हमजाची ही खेळी पाहून सुपरकॉप अमेरिकेची झोप उडाली आहे. हमजा बिल लादेन सध्या अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत अल कायदा या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करत आहे. हमजा बिन लादेन आता तालिबान आणि स्थानिक दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने 9/11 पेक्षाही मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी करत आहे. अमेरिका आणि युरोप हे त्यांच्या लक्षावर आहेत. एवढी वर्ष हमजा जिवतं आहे, ही गोष्ट अमेरिकेपासून काळजीपूर्वक लपवण्यात आली. एवढ्या वर्षात हमजाचे दशतवादी होण्याचे ट्रेनिंग चालू होते. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अतिशय गुप्त जागी ठेवण्यात आले होते. तालिबानच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांना हमजाची माहिती होती. तसेच पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांचेही हमजाला समर्थन असल्याचे सांगितले जाते. (Hamza)

==============

हे देखील वाचा : रशियावर युक्रेनची आणि व्हॅक्यूम बॉम्बची एन्ट्री

==============

सध्या अफगणिस्तानमधील गुप्त ठिकाणी अल कायदा आणि तालिबान यांच्या देखरेखीखाली हमजा रहात आहे. हमजाच्या नेतृत्वात अल-कायदा पुन्हा एकदा प्रस्थापित झाल्याचे बोलले जात आहे. फक्त हमजाच नाही तर त्याचा भाऊ अब्दुल्ला बिन लादेनचाही अल-कायदाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याचे मानले जाते. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचीही या दोन भावांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत हिंसाचार आणि दहशतवादी हल्ले करण्याचा अलकायदाचा मानस आहे. हमजा यासाठी मोठी तयारी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. हमजानं त्यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. आणि माझ्यावडिलांच्या मृत्यूची किंमत अमेरिकेला द्यावी लागेल, असा गर्भित इशारा त्यानं दिला आहे. हा व्हिडिओ बघूनच मृत समजत असलेला हमजा जिवंत कसा झाला हा प्रश्न अमेरिकन सुरक्षा एजन्सीला पडला आहे. (Hamza)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.