विद्येची देवता, विघ्नांचा हर्ता, ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सगळीकडेच जय्यत तयारी चालू आहे. डेकोरेशन, आरास, मूर्ती, साफसफाई आदी गोष्टी शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. आता कधी ७ सप्टेंबरचा दिवस उजाडतो आणि कधी सगळ्यांचा लाडका बाप्पा आपल्या घरी विराजमान होतो असे सर्वांना झाले आहे.
गणपती बाप्पा आल्यानंतर त्यांची सेवा आणि पूजा करण्यातच आपला वेळ सर्व जणं खर्चिक करतील. या गणेश चतुर्थीला किंवा जेवढे दिवस गणपती घरी आहे तेवढे दिवस किंवा वर्षभर, विशिष्ट खास दिवशी तुम्ही गणपती अथर्वशीर्ष नक्की म्हणा. येत नसेल तर वाचून वाचून म्हणा, इंटरनेटवर लावा पण अथर्वशीर्ष नक्की वाचा. कारण गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र हे सर्व अथर्वशीर्षांचे शिरोमणी असल्याचे मानले जाते, त्याचे वर्णन अथर्ववेदात आढळते. गणेश अथर्वशीर्ष हे पार्वती नंदन गणेशाला समर्पित करण्यात आले आहे.
अथर्वशीर्षाचे पठण कोणत्याही बुधवारी, चतुर्थी तिथी किंवा शुभ मुहूर्तावर सुरू करावे, गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी या गणपती अथर्वशीर्षाचे पठण सर्वात शुभ आणि लाभदायक मानले गेले आहे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे अथर्व ऋषी यांनी लिहिले होते ज्यांना गणपतीचे दर्शन झाले होते. कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे नामस्मरण करण्याची प्रथा आहे. चला जाणून घेऊया अथर्वशीर्षाबद्दल अधिक माहिती.
अथर्वशीर्ष हे एक उपनिषद असून ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. अथर्वशीर्षामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला खास महत्व आहे. अथर्वशीर्षाची फोड करत अर्थ लावला तर थर्व म्हणजे चंचल, अथर्व म्हणजे स्थिर तर शीर्ष म्हणजे मस्तक असा होतो. अर्थात ज्याच्या पठणामुळे मनुष्याच्या बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय.
अथर्वशीर्षाच्या सुरुवातीला गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगितली गेली असून, शेवटी गणपती परब्रह्म आहे असे सांगितले आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल, असे म्हटले आहे.
गणपती अथर्वशीर्ष पठण करताना काही नियम
* उच्चार अगदी स्पष्ट असावे.
* अथर्वशीर्ष एकाच गतीने अतिशय हळू बोलला पाहिजे.
* अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
* अथर्वशीर्ष अर्थपूर्णरीत्या पठण केले पाहिजे.
* अथर्वशीर्ष एकापेक्षा जास्त वेळा म्हणावे लागेल तेव्हा ‘वरदमूर्तये नमः’. इथपर्यंत वाचावे. त्यानंतर वटच्या आवर्तनानंतर पठण करावे.
* अथर्वशीर्षापूर्वी दिलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीला एकदाच उच्चारावा.
* गणेश अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे अभिषेक.
* गणेश अथर्वशीर्षाचे पठण करताना धूतशास्त्र, मृगजीन, धबली किंवा दर्भ चटई वापरावी.
* अथर्वशीर्ष पठण करताना मांडी बदलणार नाही याची काळजी घ्यावी.
* दक्षिण दिशेशिवाय इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
* अथर्वशीर्ष पाठ करण्यापूर्वी गुरूंना तसेच ज्येष्ठांना नमस्कार करावा.
* अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून अक्षता, दुर्वा, शमी आणि लाल फुले वाहावीत.
* पूजा करणे शक्य नसेल तर गणपतीच्या मनःस्थितीचे ध्यान करावे, नमस्कार करावा.
गणपती अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे
* गणपती अथर्वशीर्षाचे पठण केल्याने आपल्याला हे सर्व फायदे मिळतात-
* गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याने जीवनात सर्वांगीण प्रगती होते.
* गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.
* नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते.
* आर्थिक समस्येमध्ये हळूहळू परंतु स्थिरपणे आर्थिक समृद्धी येते.
* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतात.
* विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात.
* गणपतीची कृपा जाणवू लागते.
* सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात.
‘या’ लोकांनी नक्की अथर्वशीर्ष पाठ करावा
ज्यांच्या कुंडलीत राहू, केतू आणि शनीचा अशुभ प्रभाव असतो त्यांच्यासाठी अथर्वशीर्ष पाठ अतिशय फायदेशीर ठरतं असे धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय. या लोकांनी दररोज पाठ करावा.
त्याशिवाय मुलांना आणि तरुणांना अभ्यासात रस नसेल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना रोज नियमितपणे अथर्वशीर्ष पाठ करण्यास सांगितलं जातं.
गणपती अथर्वशीर्ष
ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि। त्वमेव केवलं कर्ताऽसि। त्वमेव केवलं धर्ताऽसि। त्वमेव केवलं हर्ताऽसि। त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। त्व साक्षादात्माऽसि नित्यम् ।। १ ।।
ऋतं वच्मि। सत्यं वच्मि।। २ ।।
अव त्व मां। अव वक्तारं। अव श्रोतारं। अव दातारं। अव धातारं। अवानूचानमव शिष्यं।अव पश्चातात। अव पुरस्तात। अव चोत्तरात्तात । अव दक्षिणात्तात्। अवचोर्ध्वात्तात्। अवाधरात्तात्। सर्वतो माँ पाहि-पाहि समंतात् ।। ३ ।।
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:। त्वमानंदमयसस्त्वं ब्रह्ममय:। त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।। ४ ।।
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते। सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति। सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति। सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:। त्वं चत्वारि वाक्पदानि ।। ५ ।।
त्वं गुणत्रयातीत:। त्वं कालत्रयातीतः। त्वं देहत्रयातीत:। त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं। त्वं शक्तित्रयात्मक:। त्वां योगिनो ध्यायंति नित्यं। त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव:सुवरोम ।। 6 ।।
गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं। अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं।तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपं। गकार: पूर्वरूपं। अकारो मध्यमरूपं। अनुस्वारश्चान्त्यरूपं। बिन्दुरूत्तररूपं। नाद: संधानं। सँहिता संधि:। सैषा गणेश विद्या। गणकऋषि: निचृद्गायत्रीच्छंद:। श्री महागणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नम: ।। ७ ।।
एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ।। ८ ।।
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। अभयं वरदं हस्तैर्ब्रिभ्राणं मूषकध्वजम्। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्। रक्तगंधाऽनुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्। आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते पुरुषात्परम्। एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर: ।। ९ ।।
नमो व्रातपतये। नमो गणपतये। नम: प्रमथपतये। नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय। विघ्ननाशिने शिवसुताय। श्रीवरदमूर्तये नमो नम: ।। १० ।।
एतदथर्वशीर्ष योऽधीते। स ब्रह्मभूयाय कल्पते। स सर्व विघ्नैर्नबाध्यते। स सर्वत: सुखमेधते। स पञ्चमहापातकोपपातकात प्रमुच्यते ।। ११ ।।
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति। प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति। सायंप्रात: प्रयुंजानोऽपापो भवति। धर्मार्थकाममोक्षं च विंदति ।। १२ ।।
इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम्। यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति। सहस्रावर्तनात् यं काममधीते तं तमनेन साधयेत् ।। १३ ।।
======
हे देखील वाचा : गणपती आरास करण्यासाठी सोप्या आयडिया
======
अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति। चतुर्थ्यामनश्र्नन जपति स विद्यावान भवति। इत्यथर्वणवाक्यं। ब्रह्माद्याचरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति ।। १४ ।।
यो दूर्वांकुरैंर्यजति स वैश्रवणोपमो भवति। यो लाजैर्यजति स यशोवान भवति। स मेधावान भवति। यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छित फलमवाप्रोति। य: साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते ।। १५ ।।
अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति। सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रों भवति। महाविघ्नात्प्रमुच्यते। । महापापात् प्रमुच्यते। महादोषात्प्रमुच्यते । स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति। य एवं वेद ।। १६ ।।