मराठी बिग बॉस सुरु होऊन एक महिना झाला असून, आता हा शो पाहायला खरी मजा येत आहे. सुरुवातीला तयार झालेले ग्रुप आता तुटले असून, एकमेकांचे शत्रू असलेले सदस्य आता मित्र झाले आहेत. तर मित्र असलेले सदस्य आता एकमेकांच्या विरोधात गेले आहे. त्यामुळे बिग बॉस न बघणारे देखील हे बदल पाहून बिग बॉस बघत आहे. अरबाज पटेल हा निक्की आणि अभिजीत सावंतच्या मैत्रीवर चिडलेला असल्याचं दिसून येत आहे. निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीमुळे ग्रुप बीवर टीका होत आहे.
निक्की तांबोळी अगदी पहिल्या दिवसापासूनच तिचे तेवर आणि तिचा बिनधास्तपणा दाखवत आहे. त्यामुळे तिला अनेकदा प्रेक्षकांनी आणि खुद्द रितेशने देखील समज दिली. मात्र निक्की काही काळ शांत होते आणि पुन्हा तिचा जुना स्वभाव बाहेर येतो. आता निक्की घरातील अशी सदस्य बनली आहे, जिचा घरातील सर्वांशीच वाद झाला आहे. सध्या निक्की तिचा जवळचा मित्र असलेल्या अरबाज पटेलशी जोरदार भांडल्यामुळे कमालीची चर्चेत आली आहे. आता तर घरात नक्की एकटी पडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात बीबी करन्सी मिळवण्यासाठी एक टास्क सुरू होणार आहे. हा टास्क ‘पाताळ लोक’ नावाचा असेल. या नवीन टास्कसाठी घरात दोन टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. एका ग्रुपमध्ये अभिजीत-निक्की, वैभव-धनंजय आणि पॅडी-घन:श्याम असून, दुसऱ्या ग्रुपमध्ये अभिजीत-आर्या, वर्षा-अंकिता आणि सूरज-जान्हवी यांचा समावेश आहे.
View this post on Instagram
सध्या बिग बॉसचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसते की, घरातील स्पर्धकांना माणकाप्याच्या गुहेतून सोन्याची नाणी जिंकून आणायची आहेत. यातून ते त्यांना या घरात टिकून राहण्यासाठी योग्य ते सामान खरेदी करू शकतील.
दरम्यान आता ‘बिग बॉस’च्या घरात वाण सामान संपले असून हे सामान विकत घेण्यासाठी सर्वांना बीबी करन्सी कमवायची आहे. ही बीबी करन्सी कमवण्यासाठी घरातील सदस्यांना मानकापाच्या गुहेत जाऊन सोन्याची नाणी आणायची आहेत. यासाठी सर्वांना नेमून दिलेल्या टीममध्येच आणि नेमून दिलेल्या जोडीदाराबरोबरच हा टास्क पूर्ण करायचा आहे.
बीबी करन्सी मिळवण्यासाठी घरातील स्पर्धक एकमेकांमध्ये चांगलेच भांडताना या प्रोमोमधून दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये अरबाज त्याच्याकडे करन्सी कमी असल्यामुळे जोरजोरात ओरडत असून, दुसरीकडे निक्की इतर टीमने मिळवलेली करन्सी कशी अपात्र आहे हे सांगताना दिसत आहे. मात्र हा प्रोमो गाजण्याचे मुख्य कारण तर वेगळेच आहे.
मागील आठवड्यापासून निक्की आणि अभिजित सावंत चांगलेच मित्र बनले आहे. त्यांच्या मैत्रीवरून सतत त्यांना इतर सदस्यांकडून ऐकवण्यात येत होते. अभिजितला टोमणे देखील मारले जात होते. नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या मैत्रीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची मैत्री गाजत असतानाच आता असे काही घडले जे पाहून पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
======
हे देखील वाचा : पूजा सावंतने शेअर केले लग्नातील Unseen फोटो
======
झाले असे की, गेल्या दोन दिवसांपासून अभिजीत आणि निक्की यांची मैत्री घरातील सर्वच स्पर्धकांना खटकत होती. यावरून घरात राडेदेखील झाले मात्र आता अभिजीतने जाहीर केले की, “यापुढे मला पार्टनर बनायचं नाही” असं म्हणत तो निक्कीबरोबरची मैत्री तोडणार असल्याचे दिसून येत आहे. अभिजीत निक्कीची साथ सोडणार आहे. त्याचा हा निर्णय घरातील सर्वच सदस्यांना इतका आवडला की, सर्वांना त्याला सॅल्युट केल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
मात्र आता हे प्रोमोमध्ये दिसणारे सर्व खरंच घडले आहे की नुसते टास्कपुरते आहे? आणि जर खरंच हे घडले असेल तर आता निक्कीचे काय होणार? तिचा काय निर्णय असेल? आदी अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला बिग बॉसच्या आगामी भागात पाहायला मिळतील.