Home » सायली संजीवचा घायाळ करणारा पारंपरिक लूक

सायली संजीवचा घायाळ करणारा पारंपरिक लूक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sayali Sanjeev
Share

Sayali Sanjeev

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. सायलीने टीव्ही आणि चित्रपटांमधून काम करत तिच्या अभिनयाने स्वतःचा नावलौकिक कमावला आहे.

Sayali Sanjeev

‘काहे दिया परदेस’ मालिकेतून अभिनयात पदार्पण करणाऱ्या सायलीने स्वतःच्या हिंमतीवर तिचे करियर घडवले आहे.

Sayali Sanjeev

मराठी मनोरंजनविश्वातील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमध्ये सायलीचे नाव प्रकर्षाने येतेच. ती नेहमीच बोल्ड, सोज्ज्वळ सर्वच प्रकारच्या भूमिका लीलया साकारत असते.

Sayali Sanjeev

सायली सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे विविध फोटोशूटमधील फोटो शेअर करताना दिसते. नुकतेच तिने तिचे गुलाबी रंगाच्या साडीतील कमालीचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev

सायलीने गुलाबी रंगाची अतिशय साधी बुट्ट्या असलेली काठापदराची साडी नेसली आहे. या साडीला तिचे पिवळ्या रंगाचे एम्ब्रॉयडरी असलेले ब्लाऊज चार चांद लावताना दिसत आहे.

Sayali Sanjeev

सायलीच्या या लुकबद्दल अधिक बोलायचे झाले तर तिने या साडीवर पारंपरिक गोल्डन आणि मोतीचे दागिने घातलेले आहे. यात एक चोकर आणि कानातले असून सोबतच एक चेन आणि पेंडंट देखील घातले आहे. तर सायलीने केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा लावलेला दिसत आहे. सोबतच हातात एक बांगडी, बोटामध्ये अंगठी घातली असून टिकली लावून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.