Green Tea Face Mask Benefits : ग्रीन टी चे आरोग्यदायी फायदे सर्वांनाच माहिती आहे. यामध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्सिडेंट्सच्या गुणधर्मामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. याशिवाय वजनही नियंत्रणात राहते. पण तुम्हाला माहितेय का, ग्रीन टी त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. तेलकट अथवा कोरड्या त्वचेसाठी ग्रीन टी कशाप्रकारे काम करते हे जाणून घेऊया. यासोबत ग्रीन टी पासून फेस मास्क कसा तयार करु शकतो हे देखील पाहणार आहोत.
ग्रीन टी मुळे चेहऱ्याची त्वचा उजळली जाते. त्वचेला नैसर्गिक रुपता ग्लो येतो. एवढेच नव्हे ग्रीन टी मध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्सिडेंट्समुळे सुर्याच्या किरणामुळे त्वचेच्या होणाऱ्या नुकसानीपासून दूर राहतो. ग्रीन टी त्वचेला डीप क्लिन करते. यामुळेच त्वचेसाठी ग्रीन टी च्या फेस मास्कचा वापर करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या स्किन टाइपनुसार ग्रीन टी फेस मास्क तयार करू शकता.
तेलकट त्वचेसाठी ग्रीन टी फेस मास्क
ग्रीन टी मुळे सीबमचे त्वचेमधील प्रोडक्शन कमी करते. याशिवाय ग्रीन टी मध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. मुल्तानी माती अतिरिक्त तेल शोषून घेते आणि लिंबाचा रस पोर्स घट्ट करण्यासाठी एस्ट्रिदेंटच्या रुपात काम करतात.
आवश्यक सामग्री
1 चमचा ग्रीन टी
1 चमचा मुल्तानी माती
लिंबाचा रस
असा तयार करा फेस मास्क
सर्वप्रथम ग्रीन टी तयार करुन थंड होऊ द्या. यामध्ये सर्व सामग्री मिक्स करा. चेहरा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यावर फेस मास्क लावा. जवळजवळ 15 मिनिटे फेस मास्क चेहऱ्याला लावून ठेवा. यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवा.
कोरड्या त्वचेसाठी ग्रीन टी फेस मास्क
ग्रीन टी मुळे चेहऱ्याच्या त्वचेमध्ये ओलसरपणा टिकून राहतो. मधात अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. याशिवाय दह्यामुळे त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होते.
आवश्यक सामग्री
1 चमचा ग्रीन टी
1 चमचा मध
1 चमचा दही
असा तयार करा फेस मास्क
सर्वप्रथम ग्रीन टी तयार करुन थंड होऊ द्या. सर्व सामग्री मिक्स करुन एक घट्ट आणि मऊसर पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर आणि मानेवर पेस्ट लावा. पेस्ट 15-20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.
कॉम्बिनेशन त्वचेसाठी ग्रीन टी फेस मास्क
ग्रीन टी तुमच्या त्वेचाला बॅलेन्स करते. तर ओटमील त्वचेला हळूहळू एक्सफोलिएट करण्यासह त्वचेमधील अतिरिक्त तेल शोषून घेते. मधामुळे त्वचेला चमक येते.
आवश्यक सामग्री
1 चमचा ग्रीन टी
1 चमचा ओटमील
1 चमचा मध
असा तयार करा फेस मास्क
सर्वप्रथम ग्रीन टी तयार करुन घ्या. यानंतर ग्रीन टी मध्ये ओटमील आणि मध मिक्स करुन पेस्ट तयार करा. फेस मास्क चेहऱ्यावर समान रुपात लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
ग्रीन टी फेस मास्क लावण्यासंदर्भात टीप्स
-चेहऱ्यावर कोणताही मास्क लावण्याआधी पॅच टेस्ट करुन पहा.
-ग्रीन टी पासून तयार केलेला फेस मास्क दररोज लावणे टाळा. आठवड्यातून एकदा ग्रीन टी च्या फेस मास्कचा वापर करू शकता.
-ग्रीन टी चा फेस मास्क आठवडाभर तयार करुन फ्रिजमध्ये ठेवू शकता.