सुपरकॉप अमेरिकेत सध्या एकापाठोपाठ एक अशा आजारांचा विळखा पडत चालला आहे. आधीच जागतिक आरोग्य संघटनेनं अमेरिकेत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत काळजी व्यक्त केली असतांना अमेरिकेत अजून एका साथीजन्य आजारानं एन्ट्री घेतली आहे. या तापाचं नाव आहे स्लॉथ फिव्हर. या तापाचं दुसरं सोप्प नाव आहे, आळशी ताप. म्हणजेच नावाप्रमाणे हा ताप एकदा आला की बरा होण्यासाठी बराचसा वेळ घेतो. काहीवेळ हा आळशी ताप अगदी महिनाभराचाही मुक्काम ठोकतो. त्याकाळात हा ताप ज्याला झाला आहे, त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन, त्याला सांधेदुखी, आणि अन्यही आजारांना तोंड द्यायाला लागत आहे. अमेरिकेत या आळशी तापाचे रुग्ण मिळायाला सुरुवात झाली असून याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Sloth Fever)
नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेनं मंकिफॉक्स या रोगाबाबत सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. मात्र या मंकिफॉक्सपेक्षा वेगानं पसरेल असा नवा रोग अमेरिकेत आढळला आहे. या रोगाचे नाव आहे, स्लॉथ फिव्हर. त्याला आळशी ताप असेही म्हटले जाते. अमेरिकेत या तापाचे रुग्ण मिळाल्यानं जागतिक आरोग्य संघटना अधिक सतर्क झाली आहे. कारण आधीच अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. अशावेळी स्लॉथ फिव्हर नावाच्या आणखी या नव्या आजाराचे रुग्णही अमेरिकेत मिळायला सुरुवात झाली आहे. सध्या अमेरिकेत अनेक रोगांच्या साधी वेगानं पसरत आहेत. कोव्हिडच्या नव्या विषाणुंचे रुग्ण अमेरिकेत आढळत आहेत. सोबत साल्मोनेला नावाचा रोगही मुलांमध्ये पसरत आहे. यासोबत आता स्लॉथ फिव्हर हा नवा आजार अमेरिकेत दाखल झाला आहे. त्यामुळे हा ताप चिंतेचा विषय झाला आहे. तज्ञांच्या मते, स्लॉथ फिव्हर म्हणजे मिडज नावाच्या विषाणुपासून पसरणारा आजार आहे. (Sloth Fever)
हा विषाणू काही डास आणि कीटकांमध्ये सापडतो. जेव्हा एखादा माणूस त्यांच्या संपर्कात येतो तेव्हा त्याला या विषाणूची लागण होते. डेंग्यू, चिकुनगुनिया आणि रॉस रिव्हर सारखाच हा स्लॉथ फिव्हर आहे. या विषाणुची लागण झाल्यावर ब-याचवेळानं लक्षात येते. त्यामुळे हा ताप जाण्यासाठी काही वेळ लागतो. म्हणूनच त्याला आळशी ताप असेही नाव मिळाले आहे. हा तापाची लागण झाली आहे, असे समजण्याचे प्राथमिक लक्षण म्हणजे, प्रचंड डोकेदुखी होतेच, सोबत डोळेही दुखू लागतात. शिवाय भूक मंदावते आणि मळमळ चालू होते. काही रुग्णांच्या अंगावर पुरळ उठल्याचेही दिसते. तसेच काहींना चक्कर आणि शारीरिक वेदना जाणवू लागतात. मळमळ सोबत पुरळ उठू शकते. तसेच काहीवेळा आळशी तापाची लागण झालेल्या रुग्णांना तीव्र सांधेदुखीही जाणवू लागते. एकूण या आळशी तापाची ठराविक लक्षणे नाहीत. हेच कारण आहे की, त्याचे निदान उशीर होते, आणि त्यामुळे हा ताप लवकर बरा होत नाही. (Sloth Fever)
या तापावर विशिष्ट असे औषध सध्या तरी नाही. मात्र संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळणे रहा सर्वाधिक सुरक्षतेचा मार्ग आहे. युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने यासंदर्भात आपल्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ब-याचवेळा आळशी तापाचा संसर्ग बरा झाला तरी रुग्णाला अशक्तपणा रहातो, आणि शारीरिक वेदनाही. अशावेळी अन्य कुठल्याही तापाच्या रुग्णाच्या संपर्कात येण्याचे टाळावे असेही आवाहन आहे.
अमेरिकेत आढळलेल्या या नव्या तापाचा विषाणू पहिल्यांदा १९५५ मध्ये ओळखला गेला. या विषाणूने संक्रमित सुमारे ६०% लोक आजारी पडतात. पण हा आजार गंभीर झाल्यास मेंदुज्वरापर्यंत त्रास होण्याची शक्यता आहे. (Sloth Fever)
======
हे देखील वाचा : पाळी लांबवण्याच्या गोळ्यांचे दुष्परिणाम
======
ब्राझीलमध्ये या आळशी तापाचा संसर्ग होऊन दोन महिलांचा मृत्यू झाल्यानं अमेरिकेतील आरोग्य संघटना सतर्क झाल्या आहेत. कारण अमेरिकेत चिकनगुनीया, झिका, कोरोना सारख्या तापांच्या रुग्णांची संख्या आधीच अधिक आहे. अशात या नव्या आळशी तापाच्या रुग्णांची संख्या वाढली तर आरोग्य संघटनेवर मोठा ताण येणार आहे. पुढच्या काही महिन्यात अमेरिकेत निवडणुका होत आहेत. अशावेळी मोठ्या सभा आणि प्रचारमोहिमा होणार आहेत. अशावेळी हजारो नागरिक एकत्र येणार आहेत. या नागरिकांना मास्क वापरण्याच्या सूचना द्याव्यात का यावर आता तिथे विचार सुरु आहे. एकूण सुपरकॉप अमेरिका सध्या रोगांच्या विळख्यात आहे. (Sloth Fever)
सई बने