आजच्या घडीला मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेला ओळखले जाते. चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्तम अभिनय करत तिने तिची वेगळी आणि मोठी ओळख तयार केली आहे.
प्रार्थना एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम फॅशनेस्टा देखील आहे. आपण तिचे इंस्टाग्रामवरील फोटो पाहिले तर लक्षात येईल की, तिचा फॅशनसेन्स चांगला असून, ती विविध लूक अतिशय कॉन्फिडन्टली कॅरी करते.
आपल्या निखळ सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी प्रार्थना सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसत असते.
नुकतेच प्रार्थनाने एक कमाल फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिने साडी नेसलेली असून, त्यात ती कमालीची मादक आणि सुंदर दिसत आहे.
तिचे हे फोटो पाहिले तर त्यात प्रार्थनाने गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. अतिशय पातळ असणाऱ्या या साडीमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसत आहे. या साडीला अतिशय छोटे हिरव्या रंगाचे काठ असून मध्ये मध्ये सोनेरी रंगाच्या बुट्ट्या देखील आहे.
प्रार्थनाने या गुलाबी रंगाच्या साडीवर निळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. तिचा हा निळ्या रंगाचा डीपनेक ब्लाऊज प्रार्थनाच लूक ग्लॅमरस बनवताना दिसत आहे.
प्रार्थनाच्या मेकअपबद्दल सांगायचे झाले तर तिने अतिशय साधा मेकअप केला असून मॅचिंग लिपस्टिक लावली आहे. सोबतच आयलायनरने डोळे सुंदर आकर्षक केले आहेत. मुख्य म्हणजे तिने या लुकला पारंपरिक टच देण्यासाठी हातात हिरवा चुडा घातला आहे. कमीत कमी दागिने परिधान करून तिने हा लुक पूर्ण केला आहे.
सध्या प्रार्थनाच हा लूक सगळ्यांनाच खूप आवडताना दिसत आहे. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.