Depression Symptoms : डिप्रेशन एक गंभीर मानसिक आरोग्य समस्या आहे. यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग डिप्रेशनचा शिकार होत असल्याचे दिसून येत आहे. काहींना कळत देखील नाही की, ते डिप्रेशनचे शिकार झाले आहेत. अशातच डिप्रेशनची अशी कोणती 6 लक्षणे आहेत जी व्यक्तीमध्ये दिसून येतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
डिप्रेशनचे शिकार होण्याआधी दिसतात पुढील ही लक्षणे
-जर तुम्ही अत्याधिक प्रमाणात अथवा कमी प्रमाणात खात असाल तर हे डिप्रेशनच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. तणावाच्या कारणास्तव अधिक भूक लागते. तणाव कमी करण्यासाठी हेल्दी फूड खावे असा सल्ला दिला जातो. पण तणावाखाली असणाऱ्या व्यक्ती जेवणे करणे देखील टाळतात.
-निराशा आणि दु:ख डिप्रेशनमधील सर्वसामान्य लक्षण आहे. एखादे काम करण्याआधीच हाती निराशा आल्यास अथवा लहान गोष्टींवरुन वाईट वाटत राहिल्यास हे डिप्रेशनचे लक्षण असल्याचे मानले जाते.
-कोणत्याही मेहनतीशिवाय अथवा हालचालीशिवाय थकवा जाणवणे देखील डिप्रेशनचे संकेत आहेत. यामुळे झोप पूर्ण होत नाही.
-ज्या कामात आधी मन लागायचे, आनंद मिळायचा तेच करताना कंटाळा येणे देखील डिप्रेशनचे संकेत असल्याचे मानले जाते.
-डिप्रेशनमध्ये असणारी व्यक्ती जेवण करणे देखील कमी करतो अथवा करत नाही.
-तुम्हाला रात्री अजिबात झोप येत नाही अथवा उशिराने झोपता तर हे देखील डिप्रेशनचे लक्षण आहे. चिंतेमुळे झोप येत नाही. याशिवाय शरिरातील शरिरातील उर्जेच्या कमतरतेमुळे अधिक झोप लागत नाही.
-कोणत्याही गोष्टीवरुन तुम्ही संताप व्यक्त करत असाल तर हे एक डिप्रेशनचे संकेत आहे. चिंतेच्या कारणास्तव व्यक्तीवर सातत्याने भावनात्मक दबाव निर्माण झालेला असतो. यामुळे व्यक्ती लहानलहान गोष्टीवरुन चिडचिड करतो. (Depression Symptoms)