सध्या बिग बॉसचे घर हे युद्धाचे मैदानच झाले आहे. या घरात सतत शाब्दिक युद्ध रंगताना दिसत असतात. सोबतच मोठ्या वयाने आणि अनुभवाने मोठ्या कलाकार किंवा सहसदस्यांबद्दल देखील अपमानास्पद बोलले जात आहे. या गोष्टींमुळे सतत या घरातील काही मोजक्या सदस्यांवर सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे.
यात जान्हवी किल्लेकरचे नाव सर्वात वर आहे. सतत घरातील सदस्यांसोबत विविध वाद आणि त्यांचे अपमान करणारी जान्हवी आता प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात नकोच आहे. आता सध्या जान्हवीवर पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केल्यामुळे टीका होताना दिसत आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क पार पडला. यावेळी दोन्ही ग्रुपमध्ये जोरदार भांडणं झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जान्हवी किल्लेकरने पुन्हा एकदा या घरातील सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर वक्तव्य केले आणि एका नवीन वादाला तोंड फोडले आहे.
जान्हवीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात पंढरीनाथ कांबळेचा त्यांच्या अभिनय कारकिर्दीवरून अपमान केला. यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता जान्हवीचे पती किरण किल्लेकर यांनी तिला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला आणि तिच्या बोलण्याला सगळे चुकीच्या पद्धतीने घेत असल्याचे म्हटले आहे.
View this post on Instagram
किरण यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही. पण, जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली.
याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे ती नक्कीच चुकली आहे. ‘बिग बॉस’चं घर साधं घर नाही. तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत असं ही नाही. तिथे गेल्यानंतर लोक बदलतात त्यांची वागण्याची पद्धत बदलते. याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही.
लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची… बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी या बाईचा १ दिवस पाणउतारा करेन. अंकिता बोलते हिच्या मध्येच खूप खोडी आहेत अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू तेव्हा कुठे गेलेले आदर्श… तेव्हा वर्षा ताई सिनिअर नव्हत्या म्हणजे?
जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले पण, तिने नंतर वर्षा ताईंची माफी मागून त्यांची सेवा केली. हे फक्त फुटेजसाठी असतं असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा, २४ तासांच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते. ती १ तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका. ‘बिग बॉस’चा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा बस्स बोलायला खूप आहे. पण, जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक माझ्या या विषयाला आता आगीसारखं पसरवतील आणि काही तरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेछा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो.
======
हे देखील वाचा : सुरेखा कुडची यांची जान्हवीबद्दल संतापजनक पोस्ट
======
मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळुहळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी. किरण किल्लेकर #isupportjahnavi”.
या मुद्द्यावर आता रितेश देशमुख जान्हवीला काय बोलणार आणि प्रेक्षकांच्या मागणीनुसार खरंच तिला घरातून बाहेर काढणार का? हे पाहणे महत्वाचे असेल.