Home » सुरेखा कुडची यांची जान्हवीबद्दल संतापजनक पोस्ट

सुरेखा कुडची यांची जान्हवीबद्दल संतापजनक पोस्ट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bigg Boss Marathi 5
Share

मराठी बिग बॉस हा शो सध्या खूपच रंगात आला आहे. रोजच विविध टास्क आणि भांडणांमुळे या शोमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत येत असतो. सोशल मीडियावर या शोच्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मराठी बिग बॉसचे हे पाचवे पर्व खऱ्या अर्थाने वेगळे ठरताना दिसत आहे. अनेक दिग्गज आणि नावाजलेले कलाकार यावेळी घरात उपस्थित आहे. आणि यांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करतोय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख.

रितेश पहिल्यांदाच बिग बॉसचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. बिग बॉस सुरु होऊन आता चौथा आठवडा लागला आहे. त्यामुळे आता घाबरतील सगळ्याचे खरे रूप समोर यायला सुरुवात झाली आहे. घरातील सदस्यांमध्ये आता दोन ग्रुप तयार झाले असून, ते ग्रुप सतत एकमेकांवर शाब्दिक हल्ला करताना दिसतात. यातील ग्रुप ‘ए’मध्ये सर्वाधिक तोंडाळ आणि भांडकुदळ सदस्य पाहायला मिळत आहे.

अशातच आता घरामध्ये जान्हवीने पुन्हा एकदा तिचे तोंड उघडले आहे. जान्हवीने तिथे दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मंगळवारच्या झालेल्या भागामध्ये ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क खेळ चालू होता. यादरम्यान निक्की आणि अरबाज, निक्की आणि वैभव, घनश्याम अभिजीत आणि अंकिता यांच्यात वाद झालेले पाहायला मिळाले. या टास्कवेळी जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली. तिने पॅडी दा यांचा अभिनयावरून अपमान केला. वर्षा उसगांवकरांनंतर जान्हवीने पंढरीनाथ कांबळे यांच्याकडे तिचा मोर्चा वळवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surekha Kudchi (@surekha_kudachi)

जान्हवीने पंढरीनाथ यांचा अपमान केल्यामुळे आता तिच्यावर चहू बाजूने टीका केली जात आहे. कलाकारांसोबतच नेटकाऱ्यानी देखील तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. अशातच अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जान्हवीचा चांगलाच समाचार घेतला.

सुरेखा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “माज माज आणि माज…ती कोण आहे? जी बी टीमला भीक आणून देईन म्हणते…ती कोण आहे? जी त्या डीपीला गेट उघडू का विचारते?…ती कोण आहे? जी वर्षाताईला म्हणते की तुम्ही चुकलात की तुम्हाला मी योग्य दिशा दाखवेन…ती कोण आहे? जी पंढरीनाथला आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून आता इथे ओव्हर अ‍ॅक्टिंग करायला आलाय म्हणतेय…आहे कोण ती?…काय कर्तुत्व आहे तिच?…कसला माज आहे हा?…हिला बिग बॉसचा आशीर्वाद आहे का?…रितेश भाऊ जरा आवाज वाढवा…

आज मी मनापासून मांजरेकर सरांना मिस करतेय…ते असते तर त्यांचे शब्दच असे असतात की कुणाची हिंमत नाही होणार परत कुणाला असं बोलायची…शब्द ऐकूनच च*** ओली झाली असती…वारे वाह अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय, त्यांना काहीच बोललं जात नाहीये…या शनिवारी पाहायचं आहे या वर काही बोललं जातं की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं जातंय…”

दरम्यान घरामध्ये ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कच्या ब्रेकमध्ये जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरवर अपमान करणारे वक्तव्य केले. ग्रुप ए मध्ये आपण ठरतोय लक्षात आल्यावर भांडणं देखील व्हायला लागली. याच टास्कच्या वेळेत जान्हवी जोरात आणि तावातावाने बोलताना दिसली की, “हे लोक सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाहीये. यांना फक्त अ‍ॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले म्हणून ती अ‍ॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.”

======

हे देखील वाचा : ‘मी जिवंत आहे’ श्रेयस तळपदेने केली संतापजनक पोस्ट

======

हे ऐकल्यानंतर आर्या जाधव ही गार्डन एरियामध्ये बसलेल्या जान्हवीला जाब विचारण्यासाठी जाते. त्यावर जान्हवीने मोठ्या तोऱ्यात तिला “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही” असे म्हणाली. “तू जेवढं काम केलं नाहीये…तेवढी त्यांनी अ‍ॅक्टिंग केलीये. त्यांचा एक स्टेटस आहे…त्यांनी खूप काम केलंय त्यामुळे उगाच कोणाच्या करिअरवर जाऊ नकोस. इथे तू आधीच घाण करतेय पण, कोणाच्या करिअरवर केलेलं भाष्य ऐकून घेणार नाही, असे आर्या जान्हवीला म्हणते. पण, जान्हवी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहते आणि जा तुझ्या गँगला घेऊन ये असे म्हणते.

आता याचे शनिवारी भाऊच्या धक्क्यावर काय पडसाद पडतील आणि रितेश नक्की कोणती भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रितेशने जान्हवीबद्दल कठोर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आता सर्वच व्यक्त करताना दिसत आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.