Home » कोलकाता घटनेवर किरण मानेंची सणसणीत पोस्ट

कोलकाता घटनेवर किरण मानेंची सणसणीत पोस्ट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Kiran Mane
Share

मागच्या आठवड्यामध्ये कोलकाता येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. सगळ्यांनाच दिल्लीतील निर्भया केसचीच आठवण झाली. कोलकाता येथील आर. जी. कर मेडीकल महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या आठवड्यात एका महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सामान्य लोकांपासून सेलिब्रटीजपर्यंत सर्वच लोकांनी आवाज उठवत त्या पीडित मुलीला न्याय मिळत आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली.

रोजच या घटनेवर कलाकारामधून देखील संताप व्यक्त होताना दिसत आहे. अशातच मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते किरण माने यांनी देखील एक पोस्ट शेअर केली आहे. किरण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेरा करत बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले,

“…कोलकता रेप मर्डर केसमधल्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून ममता बॅनर्जींनी काढलेला मोर्चा हे निव्वळ ‘ढोंग’ आहे. अरे ! तुम्ही मुख्यमंत्री आहात मॅडम. पोलीस आणि प्रशासन तुमच्या एका आदेशावर कामाला लागायला पाहिजे. राज्याच्या प्रमुखांनीच आंदोलन आणि धरणे वगैरे करणं यापेक्षा भयाण हास्यास्पद प्रकार दुसरा असू शकत नाही. एक महिला असुन या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍या ममताजींचा त्रिवार निषेध !

हा देशच आज इतिहासातल्या सगळ्यात घृणास्पद कालखंडातून चालला आहे.

लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘आम्ही भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही’ असं म्हणत जणू स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा ममता बॅनर्जींसारखेच अशा ढोंगीपणाचे साक्षात बादशहाच !

एकिकडे मणिपूरसारख्या भयानक घटना घडूनही तिकडे न फिरकणार्‍या… कर्नाटकात तीन हजार महीलांवर बलात्कार करणार्‍याला उमेदवारी देणार्‍या… कुस्तीगीर महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍याला वाचवणार्‍या भ्रष्ट आणि नीच नराधमांनी देशाचं नरडं आवळलंय… तर दुसरीकडे बंगालसारख्या ज्या राज्यातल्या जनतेनं हुशारीनं ही अन्यायी क्रूर पिलावळ दूर ठेवली आणि ममताजींना सत्तेत बसवलं, त्यासुद्धा अशा नौटंकीबाज निघाव्यात हे केवढं मोठं दुर्दैव !

भक्तडुक्करपिलावळीला आणि चाटू मिडीयाला तर जिथं भाजपाचे सरकार नाही, तिथलेच फक्त ‘सिलेक्टिव्ह’ अत्याचार दिसतात…किंवा अत्याचार करणारा मुस्लीम असला तर मात्र यांचं तोंड आणि बुड सगळंच पेटून उठतं… इतरवेळी यांच्या बहिणींची रस्त्यात धिंड निघाली तरी हे सत्ताधार्‍यांची बाजू घेऊन तिला देशद्रोही ठरवत खदाखदा हसतील. अशा नालायक लोकांच्या भवतालात गुरफटलेल्या जनतेनं न्यायासाठी कुणाकडं बघायचं? कुणाचा आधार मागायचा??

=======

हे देखील वाचा : बिग बॉसमधून योगिता आणि निखिल पडले बाहेर

=======

हे असंच चालू राहिलं तर आपल्याकडं श्रीलंका आणि बांग्लादेशपेक्षा भयानक उद्रेक होऊ शकतो. सत्ताधार्‍यांनो, जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.

ये कुर्सी है, तुम्हारा जनाज़ा तो नहीं है…
कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते !”

दरम्यान किरण माने यांनी त्यांच्या या पोस्टमधून ममता यांच्यासोबतच भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील सडकून टीका करत त्यांना ढोंगी म्हटले आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.