झांबिया जगातल्या सर्वात गरीब देशांपैकी एक आफ्रिकेच्या मधोमध असलेल्या या देशाची 60% लोकसंख्या दारिद्ररेषेच्या खाली आहे. मात्र हाच देश एकेकाळी चक्क मंगळ ग्रहावर उतरणार होता. हो तुम्ही बरोबर ऐकलं, सर्वात गरीब देशांपैकी एक असलेला झांबिया मंगळावर उतरणार होता आणि त्याची तयारीसुद्धा त्यांनी केली होती. आज झांबियाच्या याच अजब स्पेस प्रोग्रामची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Zambia Country)
60 चं दशक म्हणजे कोल्ड वॉरचा काळ याचदरम्यान अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियामध्ये स्पेस रेस सुरू होती. दोन्ही देश चंद्रावर मनुष्य पाठवण्याची तयारी करत होते. याचदरम्यान 24 ऑक्टोबर 1964 रोजी आफ्रिकेतला झांबिया हा देश इंग्रजांकडून स्वतंत्र झाला होता. याचवेळी प्रसिद्ध टाइम्स मॅगजिनने झांबियाच्या स्वातंत्र्यावर एक आर्टिकल लिहिला होता. या आर्टिकलच्या खाली एक फुटनोट होती, त्या फुटनोटवर लिहिलं होतं की, झांबियाचा एक माणूस या स्वातंत्र्यापासून खुश नाही कारण त्याचं लक्ष्य वेगळं आहे. त्याला चंद्र आणि मंगळ गाठायचं होतं.
लोकं हे वाचून हैराणच झाले. इतका गरीब देश, त्यात आताच स्वातंत्र्य मिळालं आहे, आणि चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करत आहेत. संपूर्ण जगभरात त्यांची थट्टा झाली. पण ज्या माणसाने हे लक्ष्य समोर ठेवलं होतं, तो फारच सीरियस होता, त्याचं नाव एडवर्ड मकूका एनकोलोसो ! झांबिया नॅशनल अकॅदमी ऑफ सायन्स, स्पेस रिसर्च अँड फिलोसॉफीचा हा अध्यक्ष ! याने चंद्रावर आणि मंगळावर उतरायचं हे पक्कं करून ठेवलं होतं. एनकोलोसोने या स्पेस मिशन्ससाठी 12 अंतराळवीर तयार करून ठेवले होते, ज्यांना Astronauts म्हटलं गेलं. याशिवाय तो त्याला कठोर प्रशिक्षण देत होता, असं पत्रकारांना कळलं. (Zambia Country)
एनकोलोसोची ट्रेनिंग थोडी अजबच होती. या ट्रेनिंगदरम्यान जे स्पेशन मिशनसाठी निवडण्यात आले आहेत, त्यांना तेलाच्या ड्रममध्ये ठेऊन झाडाला बांधून फिरवलं जात होतं. याशिवाय झीरो Gravity साठी त्यांना डोंगरावरुन खाली घरंगळत यायला सांगितलं जायचं. त्यांना झुळ्यावर झुलवलं जायचं. याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे या तयार केलेल्या अंतराळवीरांना हातावर चालणं शिकवलं जात होतं. एनकोलोसोच्या मते, स्पेसमध्ये आपण हातावर चालणच योग्य ठरू शकतं. अनेकांना उंचावरून दोरीने लटकवलं जात होतं, यानंतर दोरी कापला जायचा, कारण त्यांना हवेत तरंगण्याचा अनुभव व्हावा. याचदरम्यान अनेक जन जखमीसुद्धा झाले होते. (Zambia Country)
मुळात त्यावेळी नव्या झांबियन सरकारने एनकोलोसोला कधीच गांभीर्याने घेतलं नाही. एकदा विमानातून प्रवास करत असताना त्याला ही आयडिया सुचली होती. यावेळी एनकोलोसो आणि त्याची टीम चंद्रावर आणि मंगळावर जाण्याची तयारी करत होती. रशिया आणि अमेरिकेच्या आधी आपण हे शक्य करून दाखवायचं, असं त्याचं ध्येय होतं. मंगळ मिशनसाठी त्याने केवळ एकाच मुलीला तयार केलं होतं, जीचं नाव होतं म्वाम्बा ! एनकोलोसोचं म्हणण होतं की, 1964 च्या अखेरपर्यंत 16 वर्षांची ही म्वाम्बा दोन मांजरींसह चंद्रवारी आणि नंतर मंगळवारी करेल.
चंद्रावर पोहोचल्यानंतर यानाचे दार खोलल्यानंतर आधी मांजरीला चंद्राच्या पृष्ठभागावर फेकलं जाईल, असं त्यांनी ठरवलं होतं. जर ती जिवंत राहिली, तरच सर्वांनी चंद्रावर उतरायचं. सोव्हिएत युनियनने प्रसिद्ध लायका नावाच्या श्वानाला अंतराळात पाठवलं होतं. त्यामुळे आपणसुद्धा एक श्वान अंतराळात पाठवायचा म्हणून त्यांनी सायक्लोप्स या आपल्या पाळीव श्वानाला तयार केलं होत. या मिशनचं नावसुद्धा सायक्लोप्स होतं. एकदा एका रिपोर्टरने एनकोलोसोला मिशनबद्दल विचारलं होतं, यावर त्याने उत्तर दिलं की, काही लोकांना वाटतं मी वेडा आहे, मात्र तो दिवस नक्की येईल जेव्हा मी हसेन आणि चंद्रावर झांबियाचा झेंडा फडकावेन. मी तुम्हाला याबद्दल आणखी माहिती सांगू शकत नाही, कारण इतक्या मोठ्या प्रोजेक्टमुळे माझा इतर लोकांवर विश्वास नाही. माझ्या सोव्हिएत आणि अमेरिकेपेक्षा रंगत रॉकेट्स आहेत, त्यामुळे ते चोरी होऊ नये, म्हणून मी याची माहिती कोणालाच देऊ शकत नाही. (Zambia Country)
=================
हे देखील वाचा : चंद्रावर जाण्यासाठी सूपर हायवे !
================
हे मिशन पूर्ण करण्यासाठी एनकोलोसोने इस्राइल, अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि यूनेस्कोकडे निधीसाठी पत्रसुद्धा लिहिले होते. मात्र त्याला कुठूनही मदत मिळाली नाही. पण हे सगळं कोणतही स्पेस मिशन नसून निव्वळ वेडगळपणा होता, हे आता जगजाहीर झालं होतं. मात्र हा खुळचटपणा एनकोलोसोने का केला होता, याचं उत्तर कोणालाच मिळालं नाही. काही महिन्यांनी त्याने आपल्या या बोगस स्पेस मिशनला गुंडाळलं. यावर उत्तर देत त्याने म्हटलं की, आम्हाला निधी मिळाला नाही. त्यातच आमचे जे Astronauts होते, ते एकदा दारू प्यायला गेले आणि ते परत आलेच नाही. एकाने प्रोजेक्ट सोडला आणि त्याने कोणत्या तरी डान्स ग्रुपमध्ये प्रवेश केला. ग्रुपमधली एक जण प्रेगनेन्ट झाली, त्यामुळे ती घरी गेली. अशी उत्तरं त्याने दिली.
मुळात सर्वांना आधीपासूनच एनकोलोसोच्या या खोट्या मिशनची माहिती होतीच, मात्र हे कुठपर्यंत चालणार, याचीच सर्व वाट पाहत होते. अखेर त्याचं पितळ उघड पडलं, मात्र 1964 मध्ये एनकोलोसोच्या या मिशनची सर्वत्र चर्चा झाली होती. एनकोलोसोने नंतर राजकारणात प्रवेश केला. यानंतर 1989 साली वयाच्या 70 व्या वर्षी तो वारला. मात्र आजही झांबियामध्ये तो या एका गोष्टीमुळे सगळ्यांच्याच लक्षात राहिला आहे. (Zambia Country)