Lips Care Tips : मेकअप करणे सर्व महिलांनाच आवडते. प्रत्येक दिवशी कोणीही हेव्ही मेकअप करत नाही. सध्याच्या बदलत्या ब्युटी ट्रेंडच्या मार्केटमध्ये तुम्हाला काही प्रकारचे प्रोडक्ट्स पहायला मिळतील. बहुतांशजणी हलका मेकअप करण्यासह आवर्जुन लिपस्टिक लावतात. खरंतर, बदलत्या ऋतूनुसार अथवा योग्य पद्धतीने स्किन केअर रुटीन फॉलो न केल्यास ओठ फाटण्यास सुरुवात होऊ लागते. यामागे काही कारणेही असू शकतात. जाणून घेऊया ओठांवर दीर्घकाळ लिपस्टिक टिकून राहण्यासाठी कशाप्रकारे ती लावावी याबद्दल सविस्तर…
का फाटतात ओठ?
सर्वसामान्यपणे बदलत्या ऋतूमुळे ओठ फाटण्यास सुरुवात होते. अशातच दररज लिप केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. ओठ फाटण्यामागील एकमेव कारण म्हणजे त्वचा कोरडी होणे अथवा त्वचेमध्ये ओलसरपणा कमी असणे.
फाटलेल्या ओठांची अशी घ्या काळजी
फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी दररोज लिप केअर रुटीन फॉलो करावे. यासाठी दिवसातून तीन ते पाच वेळा लिप बाम लावू शकता. याशिवाय ओठांवरील डेड स्किन हटवण्यासाठी लिप स्क्रिबचा वापर करू शकता. अधिक लिप केअरसाठी तुम्ही रात्री झोपण्याआधी ओठांना तेल लावू शकता. (Lips Care Tips)
फाटलेल्या ओठांवर अशी लावा लिपस्टिक
फाटलेल्या ओठांवर लिपस्टिक लावण्याआधी सर्वप्रथम योग्य पद्धतीने मॉश्चराइजिंग करा. याशिवाय अशा लिपस्टिकचा वापर करा ज्यामध्ये आधीपासूनच तेल असेल. यासाठी मार्केटमध्ये काही प्रकारचे ब्रँड उपलब्ध आहेत. काही लिपस्टिकमध्ये तेल आणि व्हिटॅमिन ई असणाऱ्या लिपस्टिक शेड्स मिळतील. तुमचे ओठ फाटलेले असल्यास मॅट लिपस्टिकएवजी ग्लॉसी लूक असणाऱ्या लिपस्टिकची निवड करा.