झुडियो, एक भारतीय फास्ट-फॅशन ब्रँड, आपल्या अल्पवधीतच प्रचंड यश संपादन केले आहे. २०१६ मध्ये स्थापन झालेल्या झुडियोने भारतीय बाजारपेठेत आपल्या स्वस्त, तरीही ट्रेंडी कपड्यांच्या जोरावर जलद विस्तार केला आहे. झुडियोने केवळ काही वर्षांत ४००० कोटींचा बाजारमूल्य प्राप्त केला आहे आणि १६४ शहरांमध्ये ५४५ हून अधिक स्टोअर उघडली आहेत. (Tata Group’s Zudio)
जग वेगाने धावत आहे, आणि या वेगात आपल्या गरजा सुद्धा झपाट्याने बदलत आहेत. त्यामुळे आपली जीवनशैली आणि आपण स्वतःही अपग्रेड होत आहोत. सुरवातीला आपण कपडे अंग झाकण्यासाठी घालत असू, पण आता ते फॅशन आणि स्टाइलसाठी घालतो. यामुळेच भारतात फॅशन इंडस्ट्रीची मार्केटवॅल्यू जवळजवळ आठ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. याचं एक कारण म्हणजे अनेक फॅशन ब्रॅंड्सचे कपडे खूप महाग असतात. पण तरीही, या इंडस्ट्रीमध्ये सर्वात स्वस्त, तरीही स्टायलिश आणि फॅशनेबल कपडे विकून, Tata ग्रुपच्या झुडिओ ने स्वत:ला फक्त काही वर्षात ४००० कोटींचा ब्रॅंड बनवलं आणि तेही एकही जाहिरात न करता! काय आहे झुडिओ च्या यशाची कहाणी जाणून घेऊया टाटाच्या झुडिओची सुरुवात २०१६ मध्ये झाली, आणि २०२३ च्या अखेरीस झुडियोचं उत्पन्न ₹४,००० कोटींपेक्षा जास्त होतं. (Tata Group’s Zudio)
अनेक मोठमोठे ब्रॅंड्स जिथे कपडे महाग विकतात, तिथे झुडिओमध्ये एकही वस्तू ₹१००० रुपयांच्या वर नाहीये. झुडिओने सामान्य लोकांच्या गरजा ओळखून आपला ब्रॅंड स्थापन केला. आधी इतके ब्रॅंडेड कपडे घेण्यासाठी मोठमोठे शोरूम्स नव्हते, आणि जे होते ते सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नव्हते. झुडिओने आताच्या पिढीची फॅशन समजून स्वतःच्या उत्पादनात तरुणांना वेगळे वाटतील आणि आकर्षित करतील असे रंग आणि डिझाईन्सचा समावेश केला. त्यामुळे सामान्य माणसाला स्वस्त दरात फॅशनेबल कपडे विकत घेण्यासाठी हक्काची जागा मिळाली. पण इतके स्वस्त कपडे विकणं झुडियोने कसं साध्य केलं आणि त्यांना ते परवडलं का? तर हो. एक टी-शर्ट बनवण्यासाठी एखाद्या कंपनीला त्याच्या डिझाइन आणि निर्मितीचा खर्च येतो.
डिझाईनसाठी डिझायनर्सची टीम कामावर न ठेवता, झुडियो आधीच प्रसिद्ध असलेले किंवा ट्रेंडमध्ये असणाऱ्या कपड्यांची डिझाइन थोडे फार प्रमाणात बदलून वापरते आणि निर्मितीसाठी एखादा कारखाना न टाकता खाजगी होलसेल विक्रेत्यांकडून आपले कपडे बनवून घेतं. त्यामुळे त्यांना कपडे बनवण्यासाठी जास्त खर्च येत नाही. शिवाय, वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून कपडे घेतल्याने झुडियोच्या कपड्यांमध्ये विविधता सुद्धा असते. झुडियोची आणखी एक रणनीती म्हणजे दर महिन्याला आपल्या शोरूममधून ६०% माल बदलतात. त्यामुळे ग्राहकांना सुद्धा नवनवीन वेरायटी असलेले कपडे दर महिन्याला मिळतात. (Tata Group’s Zudio)
==================
हे देखील वाचा : नागपूरच्या देविदास सौदागरांची यशोगाथा
================
शोरूम स्थापन करण्यासाठी सुद्धा टाटा ग्रुप पैसे खर्च करत नाही. ते त्यासाठी FOCO मॉडेलचा वापर करतात, म्हणजेच फ्रँचायजी ओन्ड कंपनी ऑपरेटेड. याचा अर्थ झुडियो शोरूम उघडण्यासाठी एक पार्टनर शोधतात, आणि त्या पार्टनरने फक्त शोरूम स्थापन करण्यासाठी पैसे खर्च करायचे असतात. मग ते चालवणार टाटा ग्रुप असतो, ज्यामुळे त्या पार्टनरला जास्त काम न करता फायदा होतो. आणि मुळात झुडियो शोरूम शहराच्या मुख्य जागेवर नसतात, त्यामुळे शोरूम स्थापन करण्यासाठी सुद्धा जास्त खर्च येत नाही. त्यामुळे झुडियोचे १६४ शहरात ५४५ शोरूम्स आहेत आणि ते आणखी वाढत चालले आहेत. टाटा ग्रुपने आधीच सामान्य माणसांना परवडेल अशी चारचाकी गाडी नॅनो बाजारात आणली होती, पण लोकांनी त्याकडे पाठ फिरवली. पण झुडिओच्या पर फेक्ट रणनीतीमुळे ते आज H&M आणि ZARA सारख्या कंपन्यांना बरोबरीची टक्कर देत, सामान्य माणसांसाठी असणारा खूप मोठा ब्रॅंड उभारू शकले आहेत. (Tata Group’s Zudio)