Home » मेंदूला हेल्दी ठेण्यासाठी महत्वाचे असतात हे 3 व्हिटॅमिन्स

मेंदूला हेल्दी ठेण्यासाठी महत्वाचे असतात हे 3 व्हिटॅमिन्स

वाढत्या वयासह मेंदूला हेल्दी ठेवण्यासाठी काही गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे. काही नव्या रिसर्चनुसार, तीन खास व्हिटॅमिन्स मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याबद्दल जाणून घेऊया...

by Team Gajawaja
0 comment
Deep brain stimulation
Share

Vitamins for Brain Health : वाढत्या वयासह शरिरासह मेंदूच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कारण वाढत्या वयासह स्मरणशक्ती कमी होते असे म्हटले जाते. अशातच मेंदूला चालना देण्यासाठी योग्य पोषण तत्त्वांची आवश्यकता असते. एका नव्या रिसर्चनुसार, व्हिटॅमिन बी-12, फोलिक अॅसिड आणि कोलीन मेंदूसाठी फायदेशीर असते. हे व्हिटॅमिन्स योग्य प्रमाणात खाल्ल्यास वाढत्या वयासह आपला मेंदू हेल्दी राहतो. यामुळे खाण्यापिण्यात पोषण तत्त्वांचा समावेश असावा.

व्हिटॅमिन बी-12 चे महत्व
व्हिटॅमिन बी-12 आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असते. यामुळे शरिरात उर्जा तयार होणे, रक्त कोशिका निर्माण करण्यासह नर्व सिस्टम योग्य पद्धतीने काम करण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी-12 मेंदूच्या कोशिकांना हेल्दी ठेवण्यास महत्वाची भूमिका साकारतात. यामुळे स्मरणशक्तीही मजबूत होते. वाढत्या वयात व्हिटॅमिन बी-12 चे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

फोलिक अॅसिड
फोलिक अॅसिडला व्हिटॅमिन बी-9 असेही म्हटले जाते. यामुळे मेंदूच्या कोशिकांमध्ये वाढ आणि विकास होण्यास मदत होते. कोलीनमुळे मेंदूला विचार करणे आणि समजून घेण्याची क्षमता वाढवण्यास मदत होते. कोलीनचे योग्य प्रमाणात सेवन केल्यने आपला मेंदू उत्तमपणे काम करू शकतो. याशिवाय आपण काही गोष्टी व्यवस्थितीत समजून घेऊ शकतो.

या व्हिटॅमिन्सचे स्रोत
-व्हिटॅमिन बी 12
अंडे, मासे, दूध आणि चिकनध्ये व्हिटॅमिन बी12 असते. हे मेंदू आणि शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असते.

-फोलिक अॅसिड
हिरव्या पालेभाज्या, फळ आणि नट्समधून फोलिक अॅसिड मिळते. यामुळे मेंजू आणि शरिरासाठी अत्यंत फायदा होता. (Vitamins for Brain Health)

-कोलीन
अंड्याचा पिवळा भाग, मासे आणि नट्समध्ये कोलीन असते. यामुळे मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत होते. याचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता.


आणखी वाचा :
मधुमेहासाठी कारणीभूत ठरतील या 4 चूका
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर ठेवतील ही फायबरयुक्त फळ

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.