Home » थंड पाण्याने अंघोळ केल्याने होती ‘हे’ फायदे

थंड पाण्याने अंघोळ केल्याने होती ‘हे’ फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cold Shower Benefits
Share

रोज सकाळी उठल्यावर आपण अंघोळ करतो. आपल्या भारतीय लोकांमध्ये अनेक लोकं अंघोळ झाल्याशिवाय काही खात नाही, पीत नाही, देवाला हात लावत नाही. एकुणच काय तर आपल्याकडे अंघोळ करणे शास्त्र आहे. शरीराची स्वच्छता ठेवण्यासाठी आपण रोज किमान एकदा तरी अंघोळ करतो. अंघोळ केले की एकदम फ्रेश वाटते असे बरेच लोकं बोलतात. (Cold Shower Benefits)

अंघोळ हा आपल्या सर्वांच्याच दिनचर्येचा महत्वाचा आणि आवश्यक असा भाग आहे. अंघोळ करून फक्त शरीर स्वच्छ होते असे जर आपल्याला वाटत असेल तर हे काही अंशी योग्य आहे. मात्र अंघोळीमुळे शरीर स्वच्छ होण्यासोबतच अनेक चांगले फायदे देखील होतात. तुम्ही कोणत्या अर्थात थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करतात यावर तुमच्या शरीराला अंघोळीपासून होणारे फायदे ठरतात.

अनेक जणं उन्हाळ्यात थंड पाण्याने आणि पावसाळ्यात, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करतात. पण आपण असे न करता जर दररोज थंड पाण्यानेच अंघोळ केली तर त्याचे अनेक चमत्कारिक फायदे आपल्याला पाहायला मिळतील. चला जाणून घेऊया हेच फायदे.

Cold Shower Benefits

  • थंड पाण्याने अंघोळ केली तर त्याचा मेंदूवर इलेक्ट्रोशॉक थेरपीसारखा प्रभाव पडतो. ज्यामुळे एंडोर्फिन वाढून व्यक्तीला आनंदी आणि चांगले वाटते. शिवाय स्मरणशक्ती, मानसिक क्षमता आणि समन्वय वाढण्यास मदत होते.
  • थंड पाण्याने अंघोळ केली तर आपले रक्ताभिसरण वाढते. शरीराचे तापमान संतुलन परत आणण्यासाठी आपल्या शरीराच्या पेशी जलद प्रवास करतात. थंड पाण्यामुळे आपल्या हृदयाची गती वाढते आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
  • थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची सूज आणि स्नायूदुखणे कमी होते.
  • थंड पाण्याणे अंघोळ केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्र घट्ट होतात. सोबतच थंड पाण्याने केस धुतल्यास त्यातील नैसर्गिक तेल टिकून राहण्यास मदत होऊन केस चमकदार दिसतात.
  • थंड पाण्याने अंघोळ केल्यास मेटाबॉलिज्म रेट अनेक पटींनी वाढू शकतो. हेल्दी लाइफस्टाइल सोबत हा उपाय करून बघून तुम्ही वजन लवकर कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिज्म जलद असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा उपाय देखील बारीक होण्यासाठी लाभदायक ठरू शकतो.

===========================

हे देखील वाचा : जाणून घ्या आषाढी एकादशी महात्म्य आणि व्रत

============================

यात अधिक तेलकट किंवा मसालेदार प

  • थंड पाणी देखील शरीर डिटॉक्स करू शकते. सकाळी लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील विषारी पदार्थ, घाण आणि अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. हे त्या विषाणूंना देखील मारते जे नंतर संसर्गाचे कारण बनू शकतात.
  • थंड पाण्याने आंघोळ केल्याने मूड बूस्ट होतो. थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांमध्ये डिप्रेशनची लक्षणे कमी होतात. थंड पाणी शरीराच्या मज्जासंस्थेला उत्तेजित करते, ज्यामुळे हृदयगती, रक्तदाब आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढून आपल्याला अधिक उर्जा मिळते.
  • थंड पाण्याने अंघोळ केल्याने झोप चांगली लागते. तणावातून लवकर आराम आणि शांत वाटण्यासाठी झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याचा डॉक्टर अनेकदा सल्ला देतात.

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.