आजच्या घाईच्या, धकाधकीच्या आणि फास्ट फूडच्या काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकांकडे अजिबातच वेळ नाही. घड्याळाच्या काट्यावर चालणारे आयुष्य, व्यायामासाठी नसलेला वेळ आणि हेल्थी खाण्याची नसलेली आवड यांमुळे प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत त्याची हेळसांड करताना दिसत आहे. आजच्या काळात लठ्ठपणा ही मोठी समस्या निर्माण झालेली दिसत आहे. या लठ्ठपणामुळे इतरही अनेक आजार होताना दिसत आहे.
या आजारांवर आणि इतरही छोट्या छोट्या समस्यांवर एक अगदीच सोपा आणि सहजच करता येणार उपाय आहे कोमट पाणी पिणे. पाणी हे आपल्या शरीरासाठी अमृत आहे. पाण्याशिवाय आपण राहूच शकत नाही, म्हणूनच या पाण्याला जीवन म्हणतात. हे पाणी जर आपण योग्य प्रमाणात प्यायले तर अनेक आजारांना आपण पळवून लावू शकतो आणि एक उत्तम आरोग्य मिळवू शकतो. हे पाणी जर कोमट करून प्यायले तर त्याचे फायदे अधिक चांगले होतात. आज आपण जाणून घेऊया कोमट पाणी पिण्याचे फायदे.
रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम प्यायले तर आपल्या शरीराची पचन क्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्यांमध्ये देखील हे कोमट पाणी लाभदायक आहे. आतड्यांमध्ये अडकलेले अन्न हे अपचन, बद्धकोष्ठता अथवा पोटदुखीचे कारण ठरते. कोमट पाणी पिण्यामुळे आतड्याची संकुचनाची प्रक्रिया अधिक लवकर होऊन पचनक्रिया सुधारते आणि त्रास होत नाही.
कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील मेटाबॉलिजम अॅक्टिव्ह होऊ शकते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होतेच सोबतच, कोमट पाणी पिण्यामुळे आतडी स्वच्छ होतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही नियमित सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करा.
नियमीत कोमट पाणी प्यायल्याने आपली ओरल हेल्थ चांगली राहण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना कॅव्हिटीज आहे किंवा जायचे दात संवेदनशील आहेत त्यांना थंड पाणी पिण्याने त्रास होतो. मात्र कोमट पाणी पिण्यामुळे ओरल हेल्थ अधिक निरोगी राहण्यास मदत मिळते. कोमट पाण्यामुळे दातातील कीड मरण्यास मदत मिळते.
महिलांना मासिक पाळीच्या दिवसात क्रॅम्प्सचा, पोटदुखी, कंबरदुखी आणि पायातून सतत कळा येण्याचा त्रास होतो. या ४ दिवसांमध्ये त्यांना अशक्तपणा देखील येतो. अशावेळी कोमट पाण्याचा फायदा मिळतो. पोटदुखी आणि पोटात येणाऱ्या गोळ्यापासून यामुळे सुटका मिळते. मासिक पाळीच्या दिवसात सकाळी उठून कोमट पाणी प्यावे.
कोमट पाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा देखील अधिक तजेलदार बनते. त्वचा अधिक चांगली राखण्यास हे कोमट पाणी मदत करते. कोमट पाणी नियमित पिण्याने चेहऱ्यावर येणाऱ्या एजिंगच्या समस्या, सुरकुत्या, काळे डागे, पिंपल कमी होण्यास मदत मिळते. कोमट पाणी पिण्याची सवय असल्यास त्वचा अधिक चांगली राहाते. त्वचा टवटवीत होण्यासाठी पाणी उपयुक्त आहे. रोज सकाळी एक ग्लास पाणी प्यायल्याने डाग दूर होण्यास मदत होते.
कोमट पाणी प्यायल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. सोबतच स्कॅल्पमधील रक्त प्रवाह वाढतो. ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. व केस गळतीची स्मास्या दूर होते.
कोमट पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायले तर आपले शरीर आपोआप डिटॉक्स होईल. हे पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. गरम पाण्याने शरीराचे तापमान वाढून घाम येण्या सुरुवात होते. शरीरात साचलेली घाण घामानेच बाहेर पडते.
======
हे देखील वाचा : ‘या’ घरगुती गोष्टींचे सेवन थायरॉइड नियंत्रणात आणू शकतो
======
सकाळी लवकर कोमट पाणी प्यायल्यानेही शरीर दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. आपले शरीर हायड्रेटेड राहिल्याने शरीराला त्याचे कार्य करणे सोपे जाते.
डोकेदुखीच्या समस्येमध्ये देखील सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे लाभदायक असते. शरीरात पुरेसे पाणी नसले की डोकेदुखी होते. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि रोज सकाळी एक ग्लास पाण्याने दिवसाची सुरुवात करा.
कोमट पाणी नियम घेतले तर ताण आणि तणाव देखील कमी होतो. हे पाणी प्यायलामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा अतिशय उत्तम पद्धतीने होतो आणि शरीर आनंदी राहते. यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती देखील वाढते.