Home » चारकोलच्या मदतीने किचनमधील या वस्तू करता येतील स्वच्छ

चारकोलच्या मदतीने किचनमधील या वस्तू करता येतील स्वच्छ

चारकोलच्या मदतीने किचनची स्वच्छता करण्यासाठी काही हॅक्स जाणून घेणार आहोत. याच्या मदतीने काही काम करू शकता.

by Team Gajawaja
0 comment
Charcoal Use for Kitchen Cleaning
Share

Charcoal Use for Kitchen Cleaning : चारकोल म्हणजेच कोळसा गेल्या काही काळापासून ब्युटी इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. त्वचेचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी महिला चारकोलचा वापर करतात. याचा वापर करून काहीजण आरोग्यासंबंधित समस्या कमी करतात. दरम्यान, चारकोलाचा वापर केवळ ब्युटीच नव्हे तर किचनमधील स्वच्छता करण्यासाठीही करू शकता. चारकोलच्या मदतीने किचमधील काही गोष्टी लगेच चमकवू शकता. भांडी स्वच्छ करण्यासाठी ते टाइल्स चमकवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. जाणून घेऊया चारकोलसंबंधित काही हॅक्सबद्दल जाणून घेऊया…

फ्रिजची स्वच्छता आणि दुर्गंधी
फ्रिजची स्वच्छता आणि दुर्गंधी दूर करणे फार महत्वाचे आहे. यामुळे अन्नपदार्थ ताजे राहतेय. खरंतर, फ्रिज स्वच्छ करण्याच्या काही ट्रिक आहेत. पण यासाठी चारकोलचा वापर करू शकता. फ्रिजची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही चारकोलचा नक्की वापरून पाहू शकता. चारकोलच्या मदतीने केवळ दुर्गंधीच नव्हे तर फ्रिजमधील ओलसरपणा आणि हानिकारक बॅक्टेरिया देखील कमी करू शकता. यासाठी एका बाउलमध्ये चारकोलचे तुकडे घ्या. हेच बाउल फ्रिजमध्ये ठेवा. चारकोलच्या मदतीने दुर्गंधी शोषली घेतली जाते.

मायक्रोवेवची स्वच्छता
काही वेळेस मायक्रोवेव गरम केल्यानंतर त्यामध्ये डाग कायम राहतात. यावेळी मायक्रोवेवची स्वच्छता करणे गरजेचे आहे. जर असे केले नाही तर मायक्रोवेवला दुर्गंधी येऊ शकते. यामुळे चारकोलच्या मदतीने तुम्ही मायक्रोवेवची स्वच्छता करू शकता. (Charcoal Use for Kitchen Cleaning)

किचनमधील सिंकची स्वच्छता
सिंकला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय म्हणून चारकोलचा वापर करू शकता. यासाठी चारकोलची पावडर तयार करून घ्या. याची पेस्ट सिंकमधील डागांच्या येथे ठेवून द्या. यानंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ धुवा.


आणखी वाचा :
ऑफिस डेस्कवर चुकूनही ठेवू नका ही रोपं, यशात येईल अडथळा
कामात मन लागत नाही, वास्तूमध्ये करा हे बदल…

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.