Home » ChatGPT ला टक्कर देणार जगातील पहिले वॉइस असिस्टेंट Moshi, असा करता येईल वापर

ChatGPT ला टक्कर देणार जगातील पहिले वॉइस असिस्टेंट Moshi, असा करता येईल वापर

चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी मोशी नावाचे जगातील पहिले वॉइस असिस्टेंट तयार करण्यात आले आहे. फ्रान्समधील आर्टिफिशिअल इंटेलिजेंस कंपनी Kyutaiने मोशी तयार केले आहे.

by Team Gajawaja
0 comment
AI Chatbot Moshi
Share

AI Chatbot Moshi : आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा सध्याच्या काळात वेगाने वापर वाढला आहे. आतापर्यंत आपण सिनेमे वर्च्युअल असिस्टेंट आणि आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या रुपात पाहत होतो. पण आता एआय चॅटबॉट वास्तवात व्यक्तींमध्ये आपली ओखळ निर्माण करू पाहत आहे. तंत्रज्ञानात एवढे मोठे बदल झपाट्याने होत आहेत की, नवनवे चॅटबॉट येत आहेत. लोक मेसेजच्या माध्यमातून उत्तर देणाऱ्या एका चॅटजीपीटीचा वापर करत होते. पण चॅटजीपीटीला टक्कर देणारे जगात आणखी एक चॅटबॉट Moshi ने पाऊल ठेवले आहे. याची खासियत अशी की, हे लोकांसोबत रिअल टाइममध्ये संवाद साधू शकतात. जाणून घेऊया मोशी नक्की कसे काम करणार याबद्दल सविस्तर…

मोशी कडून दिली जाणार प्रश्नांची उत्तरे
मोसी एक आर्टिफिशिअल इंटेलिजेंस वॉइस असिस्टेंट आहे. जो फ्रान्समधील AI कंपनी Kyutai ने तयार केले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोशी व्यक्तींसोबत रिअल टाइममध्ये संवाद साधू शकतो. मोशीला अशाप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे की, जेव्हा ते व्यक्तीसोबत संवाद साधेल तेव्हा व्यक्तीला आपण एखाद्या एआयसोबत नव्हे तर खरोखर व्यक्तीसोबत बातचीत करत असल्याचे वाटले पाहिजे. यामुळेच चॅटजीपीटीपेक्षा मोशी सर्वाधिक उत्तम असल्याचे सांगितले जात आहे.

असा करा वापर
-Moshi चा वापर करण्यासाठी सर्वप्रथम युजरला us.moshi.chat येथे जावे लागेल
-वेबसाइट सुरु झाल्यानंतर एक काळ्या रंगातील स्क्रिनवर एक मेसेज दिसेल, त्याखाली स्क्रोल केल्यानंतर एका बॉक्समध्ये तुम्हाला इमेल आयडी द्यावा लागेल
-खाली दिलेल्या जॉइन क्यू ऑप्शनवर क्लिक करा
-यानंतर स्क्रिनच्या डाव्या बाजूला एक स्पिकर दिसेल, तेथे तुम्ही जे काही बोलाल तेव्हा स्पिकरमध्ये बदल होताना दिसेल
-याचा डाव्या बाजूला एक बॉक्स असेल जेथे मोशीची उत्तरे दिसतील
-अशाप्रकारे मोशीसोब युजर्सला 5 मिनिटांपर्यंत संवाद साधता येणार आहे (AI Chatbot Moshi)
-वेळ संपल्यानंतरही मोशीसोबत संवाद सुरु ठेवायचा असल्यास तुम्ही स्टार्ट ओव्हरवर क्लिक करू शकता
-सध्या युजर्सला नव्या एआय वॉइस असिस्टेंटला फ्रीमध्ये वापरता येणार आहे


आणखी वाचा :
तुमच्या परवानगीशिवाय कोणीही बंद करुच शकत नाही Smartphone, नोट करा ही सेटिंग
2038 ला खरच पृथ्वीवर उल्का आदळणार का ?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.