प्रत्येक व्यक्तीला घाम हा येतच असतो. असे म्हणतात की घाम येणे चांगले असते, त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला घामाचा सर्वाधिक त्रास होतो. थोडी हालचाल केली, घरातली काम, बाहेरची कामे आदी छोटी साधी कामं करूनही खूपच जास्त घाम या दिवसांमध्ये येतो. व्यायाम करताना घाम येणे ही एक सकारात्मक बाब मानली जाते. ज्यांना जास्त घाम येत नाही अशी लोकं तर त्यांना घाम येतो तोपर्यत व्यायाम करताना देखील दिसतात. (Excessive Sweating)
घाम येणे हे एक चांगले आणि उत्तम आरोग्याचे लक्षण मानले जाते. मात्र आपल्याकडे अशी एक म्हण आहे की, कोणतीही गोष्ट प्रमाणात असली की मगच उत्तम असते. हा नियम इथे देखील लागू होतो. घाम देखील प्रमाणात आला तरच चांगला असतो. अतिघाम येणे हे शरीरासाठी चांगले नाही. कदाचित अति घाम येणे हे एखाद्या आजाराचे लक्षण देखील असून शकते. त्यामुळे आपल्याला कधी घाम येतो, किती येतो हे बघणे महत्वाचे असते. काहीही न करत नुसते बसून असले तरी घाम येत असेल तर नक्कीच आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
दरम्यान सामान्यपणे आपल्या शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी घाम फायदेशीर असतो. शरीरात असलेल्या घामग्रंथीमधून हा घाम बाहेर येत असतो. उन्हाळ्याच्या कालावधीत घाम येणे अगदी सामान्य बाब असते. घामामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. सोबतच या घामात सोडिअम, पोटॅशियम अशी क्षारतत्वेही देखील असतात. मात्र सतत घाम येत असेल तर ती तुमच्या शरीरासाठी मोठी समस्या असू शकते. आजच्या काळात तर ऑपरेशन करुन या घामाच्या ग्रंथी काढल्या जातात.
घाम येण्याची करणे :
⦁ उन्हाळ्यात वातावरणात असलेल्या उकाड्यामुळे आणि उन्हात जास्त गेल्याने घाम येतो. उष्ण वाटेवर असल्यावरही घाम येतो.
⦁ जास्त काम, व्यायाम केल्याने देखील घाम येतो.
⦁ थायरॉइडची समस्या असेल तर.
⦁ जास्त गरम, तिखट, तर्रीदार, मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे.
⦁ शरीरात निर्माण झालेल्या पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे.
⦁ या व्यतिरिक्त काही विशिष्ट परिस्थितींमध्ये देखील घाम येतो. जसे, औषधे, मेनोपॉज, लठ्ठपणा, रक्तातील साखर कमी झाल्याने, गरोदरपणात, टयूबरकुलोसिस, स्टोक, पार्किसंस रोग, ल्यूकेमिया आणि लिम्फोमा आदी आजारांमध्ये देखील घाम येतो.
⦁ अति धूम्रपान केल्यामुळे देखील घाम येतो.
घाम कमी येण्यासाठी काही घरगुती उपाय :
⦁ आपल्याला जास्त घाम घेत असेल तर आपल्या जेवणातील मिठाचे आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी करा.
⦁ टोमॅटोचा रस, ग्रीन टी यामुळे देखील जास्त घाम येणे कमी होते.
⦁ उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायल्यामुळे देखील घाम कमी होऊ शकतो.
⦁ आहारात तेलकट पदार्थांचे सेवन बंद करा किंवा कमी करा.
⦁ उन्हाळ्यात सूती कपडे घाला हे कपडे घाम सहज शोषून घेतात.
======
हे देखील वाचा : पोट कमी करण्यासाठीचे काही उपाय
======
⦁ लिंबूपाणी नियमितपणे प्या. ज्यामुळे शरीरात मिठाचा अभाव होणार नाही.
⦁ शरीरातील ज्या भागात जास्त घाम येतो. त्या ठिकाणी बटाट्याचे तुकडे, लिंबू कापून घासा.
⦁ आपल्या आहारात द्राक्षे, बदाम आणि स्ट्रॉबेरीचा समावेश करा.
⦁ एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात लिंबू रस घालावा. त्यानंतर घाम येणाऱ्या ठिकाणी कापसाच्या बोळ्याने ते मिश्रण लावावे. त्यानंतर तीस मिनिटांनी आंघोळ करावी.