भारताच्या ओडिशा राज्यातील पुरी हे शहर भगवान जगन्नाथाचे धाम म्हणून ओळखले जाते. संपूर्ण जगामध्ये या शहराला ओळख आहे भगवान श्री जगन्नाथाचे मंदिर असलेल्या या जगन्नाथ मंदिराचा रथोत्सव म्हणजे एक मोठा आणि भव्य सोहळाच असतो. या मंदिरात भगवान जगन्नाथ, त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत. लाकडी मूर्ती असलेले हे देशातील अतिशय सुंदर आणि देखणे मंदिर आहे. (Jagannath Temple Ratna Bhandar)
जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेतील लोकांचे सर्वात मोठे श्रद्धास्थान मानले जाते. पुरीचे हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित आहे. हिंदू धर्मातील चार प्रमुख धामांपैकी एक धाम म्हणून देखील पुरीच्या या मंदिराची ओळख आहे. मंदिरातील जगन्नाथ भगवान यांच्या मूर्तींमध्ये आजही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते, अशी मान्यता आहे. या मंदिराची अनेक न उलगडलेली रहस्ये आहेत. सध्या पुरी इथे प्रसिद्ध रथोत्सव संपन्न होत आहे.
या दरम्यान आता या भगवान जगन्नाथ मंदिराचे रत्नभांडार तब्बल ४६ वर्षांनी १४ जुलै रोजी दुपारी उघडण्यात आले. १२ व्या शतकातील या मंदीरात अनेक बहुमूल्य अशा वस्तू आहेत. माहितीनुसार या मंदिरातील दागिने आणि मौल्यवान वस्तूंची यादी तयार करण्यासाठी आणि इतर दुरुस्तीसाठी हे रत्न भांडार आता उघडण्यात आले आहे. याआधी हे रत्नभांडार १९७८ साली उघडण्यात आले होते. त्यानंतर आता ४६ वर्षांनी ते पुन्हा उघडले गेले आहे. (Jagannath Temple Ratna Bhandar)
हे रत्नभांडार उघडताना काही विशेष लोकांची उपस्थिती आणि परवानग्या मिळवल्या गेल्या आणि मगच ही प्रक्रिया प्रत्यक्षात उतरवण्यात आली. ओडिशा राज्य सरकारने एक समिती स्थापन केली. त्यानंतर या समितीने १४ जुलै दुपारी दुपारी बाराच्या सुमारास मंदिरात प्रवेश केला. भांडार उघडण्याआधी त्याचे मालक देवी बिमला, देवी लक्ष्मी यांची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर मंदिराचे देखरेख करणारे भगवान लोकनाथ यांची सुद्धा परवानगी घेण्यात आली. सर्व सदस्यांनी सर्वप्रथम मंदिरात प्रवेश करत आज्ञा पूजा केली. नंतर रत्न भांडाराचा दरवाजा उघडण्यात आला
खास विधी आणि सोपस्कारानंतर हे रत्न भांडार उघडण्यात आले. हे रत्ना भांडार उघडताना ओरिसा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विश्वनाथ रथ, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन (SJTA) मुख्य प्रशासक अरबिंदा पाधी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अधीक्षक डीबी गडनायक आणि पुरीचे नाममात्र प्रमुख यांच्यासह ११ जण उपस्थित होते. ‘राजा गजपती’ महाराज यांचे एक प्रतिनिधी आदी जणं उपस्थित होते. (Jagannath Temple Ratna Bhandar)
प्राप्त माहितीनुसार, भगवान जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडारामध्ये मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, हिरे, माणिक यासह असंख्य अमूल्य दागिने आहेत. या सर्व मौल्यवान वस्तूंची मोजणी केली जाणार असून, त्याची डिजिटल पद्धतीने नोंद देखील करण्यात येणार आहे. 11 जणांच्या उपस्थितीमध्ये रत्न भांडाऱ्यातील वस्तूंची डिजिटल पद्धतीने नोंदणी ठरण्यात येणार आहे.
======
हे देखील वाचा : पीएम मोदी ठरले सर्वाधिक फॉलोवर्स असणारे नेते
=======
रत्न भांडारच्या बाहेरील आणि आतील खोल्यांमध्ये ठेवलेले दागिने आणि मौल्यवान वस्तू या लाकडी पेटीत भरुन तात्पुरते सुरक्षित खोलीत ठेवल्या जातील. त्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. (Jagannath Temple Ratna Bhandar)
१९७८ मध्ये किती सोने आणि चांदी होते?
१२८.३८ किलो सोन्याच्या ४५४ वस्तू होत्या
२२१.५३ किलो चांदीच्या २९३ वस्तू होत्या
आतल्या खोलीत
४३.६४ किलो सोन्याच्या ३६७ वस्तू
१४८.७८ किलो चांदीच्या २३१ वस्तू
बाहेरच्या खोलीत
८४.७४ किलो सोन्याच्या ८७ वस्तू
७३.६४ किलो चांदीच्या ६२ वस्तू