Foot Wear in Monsoon : पावसाळ्याचे दिवस प्रत्येकालाच आवडतात. पण पावसाळ्याचे दिवस सुरु होण्याआधी काही खास तयारी करावी लागते. ड्रेस ते फुटवेअरपर्यंतच्या गोष्टी ऋतूनुसार खरेदी कराव्या लागतात. कारण पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी, चिखलमुळे कपडे घराब होतात. अशातच पातळ सोल अथवा सँडल घालाल तर लवकरच खराब होऊ शकतात. अशातच प्रश्न उपस्थितीत राहतो की, पावसाळ्यात फुटवेअर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल जाणून घेऊया….
सोलची फ्लेक्लिबिलीटी तपासून पाहा
फुटवेअर खरेदी करताना त्याचा सोल नेहमीच तपासून पाहिला पाहिजे. याचा सोल मजबूत आहे की नाही हे पाहा. पावसाळ्यात फुटवेअरचा सोल तपासून पहावा. काहीवेळेस सोल प्लास्टिक अथवा बेकार क्वालिटीचे असल्याने ते लवकर खराब होतात. अशा फुटवेअरच्या माध्यमातून धोका उद्भवला जाऊ शकतो.
ग्रिप तपासून पाहा
पावसाळ्यात सँडल खरेदी करताना त्याची ग्रिप उत्तम असावी. सँडल अथवा शूजची ग्रिप योग्य नसल्यास पावसाळ्यात पाय घसरण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे कधीही पावसाळ्यात चालताना पडू शकता.(Foot Wear in Monsoon)
वॉटरप्रुफ फुटवेअरची निवड करा
पावसाळ्याच्या दिवसात उत्तम फुटवेअर खरेदी करावी. जेणेकरुन पावसाळ्याच्या पाण्यातून चालताना घरसण्याची शक्यता कमी असेल. पावसाळ्यात वॉटरप्रुफ फुटवेअर खरेदी करावेत असे सांगितले जाते.
