Home » किडे खा किडे !

किडे खा किडे !

0 comment
Singapore Cuisine
Share

सिंगापूर हा दक्षिणपूर्व आशियातील सर्वात लहान देश आहे. सिंगापूरची स्थापना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८१९ मध्ये केली. सिंगापूर नदीच्या मुखावर मलय कोळ्यांची वस्ती तिथे जास्त होती. ब्रिटीशांना या सिंगापूरच्या मसाल्याची गोडी लागली. आता सिंगापूर हे आधुनिक शहर झाले आहे. अनेक देशातील पर्यटक या सर्वात लहान देशात पर्यटनासाठी येतात. जगभरातील अनेक लज्जतदार खाद्यपदार्थ सिंगापूरच्या गल्लोगल्लीत मिळतात. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा पूर येथील खाऊ गल्लीमंध्ये आलेला असतो. वर्षाचे बाराही महिने सिंगापूरच्या खाऊ गल्ल्या परदेशी पर्यटकांनी भरलेल्या असतात.

सिंगापूरची मुळ खाद्यसंस्कृती ही मांसाहारी आहे. समुद्र किनारा लाभल्यामुळे या देशात अनेक प्रकारचे मासे खाल्ले जातात. पण सिंगापूरनं आपली शाकाहारी खाद्यपरंपराही जपली आहे. रोटी पराठी, तांदूळाचा केक, रुजक नावाचे सॅलेड हे पदार्थ सिंगापूरची ओळख आहेत. मात्र याच सिंगापूरमध्ये आता अधिकृतरित्या किड्यांचेही सॅलेड मिळेल हे ऐकल्यवर कदाचित किळस वाटले. पण सिंगापूरच्या सरकारनच आता खाद्य संस्कृतीला अधिक व्यापक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. टोळ, क्रिको सारखे अन्य १६ किटकांपासून केलेले खाद्य पदार्थ खाल्यास कुठलाही धोका नसल्याची घोषणा सिंगापूर फूड एजन्सीने केली आहे. (Singapore Cuisine)

संपूर्ण समुद्रानं वेढलेल्या सिंगापूर या छोट्या देशातील खाद्य संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थांचा वरचष्मा आहे. मोठ्या प्रमाणात मासेमारी या देशात केली जाते. त्यामुळे सर्वच प्रकारचे मांसे या सिंगापूरवासीयांच्या आहारात असतात. याशिवाय आशियायी देशांतील खाद्यसंस्कृतीचा मोठा प्रभाव या देशावर आहे. त्यामुळे तेथीलही प्रमुख पदार्थ सिंगापूरमध्ये सहज उपलब्ध आहेत. यासोबत सिंगापूरमध्ये देश-विदेशातील पर्यटक बाराही महिने असतात. या पर्यटकांसाठी म्हणून जगभरातील खाद्यपदार्थ सिंगापूरच्या खाऊ गल्ल्यांमध्ये मिळतात. यात कमी की या म्हणून पण आता सिंगापूरच्या खाद्य विभागानं चक्क किडे खाण्यासही परवानगी दिली आहे. सिंगापूरमध्ये अन्न नियामक म्हणून काम पहाणा-या सिंगापूर फूड एजन्सीने १६ कीटकांना खाण्यासाठी परवानगी दिली आहे. (Singapore Cuisine)

आधीच सिंगापूरमध्ये चीनमधील पर्यटक जास्त येत असल्यामुळे काही किटक खाल्ले जात होते. या किटक विकणा-यांमध्ये चीनी नागरिकांचा समावेश आहे. अगदी झुरळापासूनचे पदार्थही या सिंगापूरच्या खाऊ गल्ल्यांमध्ये मिळतात. आता याच झुरळांसोबत अन्य १६ किटकांपासून बनवलेले खाद्यपदार्थही या खाऊ गल्ल्यांमध्ये मिळणार आहेत. सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात येत असलेल्या परदेशी पर्यटकांमध्ये हे किड्यांपासून केलेले पदार्थ लोकप्रिय आहेत. आता हे किडे आणि त्यापासून केलेले खाद्यपदार्थ मिळाल्यावर सिंगापूरला येणा-या पर्यटकांची संख्या अधिक वाढेल अशी आशा येथील अन्न प्रशासन संस्थेला आहे. त्यासाठी त्यांनी टोळ, पतंग यासारख्या किड्यांवर परिक्षण केले आहे. त्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांची पाहणी करण्यात आली.

गेल्या वर्षभरापासून सिंगापूरच्या लॅबमध्ये या १६ जातीच्या किड्यांची पाहणी केली जात आहे. त्यांच्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्याचा प्राण्यांवर प्रयोग करण्यात आला. यानंतर सिंगापूर सरकारने कीटकांना मारून खाणे कायदेशीर असल्याचे जाहीर केले आहे. टोळ आणि पतंग प्रजातीमधील हे किटक चीन, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. तेथेही त्यापासून खाद्यपदार्थ तयार केले जातात. आता त्याच धर्तीवर सिंगापूरमध्ये किड्यांना खाता येणार आहे. तसेच या किटकांना चीन, थायलंड, व्हिएतनाममधूनच मागवण्यात येणार आहे. सिंगापूरमधील खाद्यसंस्कृतीवर मोठ्या प्रमाणात चीन आणि व्हिएतनामचा प्रभाव आहे. या देशात किटकांचा मोठ्या प्रमाणात मानवाच्या आहारात समावेश आहे. (Singapore Cuisine)

==================

हे देखील वाचा: शेवग्याच्या शेंगा खा आणि ‘या’ आजारांवर करा मात

==================

चीनमध्ये विषारी सापांचाही आहारात समावेश केला जातो. काही दिवसांपूर्वी याच चीनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात चीनी मोमोजमध्ये जिवंत किटक टाकत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे जिवंत किडे मोमोजमध्ये शिजवून खाण्याची चीनमध्ये परंपरा आहे. उंदीर, वटवाघुळ, किडे आणि झुरळे असे काहीही चीनी खाऊ शकतात. अगदी मांजर, कुत्रीही तेथे खाल्ली जातात. याच चीनमध्ये वटवाघुळाचे सूप सर्वाधिक खाल्ले जात असल्याची माहिती आहे. आणि त्यातून कोरोनाचा प्रचार झाल्याचे एक निदान आहे. आता चीनचाच आदर्श घेत सिंगापूरनं आपल्या देशात किटक खायला परवानगी दिली आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.