Home » पोर्न पासपोर्ट म्हणजे काय ?

पोर्न पासपोर्ट म्हणजे काय ?

0 comment
Porn Passport
Share

स्मार्टफोनच्या अतिरेकी वापराचा सर्वात घातक प्रकार म्हणजे, ऑनलाइन पोर्नोग्राफी. याला सर्वाधिक लहान मुले बळी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑनलाइन पोर्नोग्राफीची जागतिक आकडेवारी हादरवणारी आहे. अल्पवयीन मुलांना ऑनलाइन पोर्नोग्राफीपासून रोखण्यासाठी स्पेनमध्ये पोर्न पासपोर्ट नावाची संकल्पना राबवण्यात येत आहे. स्पॅनिश सरकार यासाठी एक फोन ॲप्लिकेशन लागू करणार आहे. यामध्ये डिजिटल आयडी आणि मर्यादित क्रेडिट्स आवश्यक असतील. यामुळे अल्पवयीन मुलांमधील पोर्नोग्राफीला अटकाव टाकता येणार आहे. स्पेनसारखेच फोन ॲप्लिकेशन लागू करण्याबाबत जर्मनी आणि स्विडन सारख्या देशात विचार करण्यात येत आहे. जगभरात या पोर्न पासपोर्ट संकल्पनेला पाठिंबा मिळत आहे. (Porn Passport)

यासाठी डेल उना वुएल्टा या अँटी पोर्नोग्राफी ग्रुपने सुरू केलेली मोहीम मार्गदर्शक ठरली आहे. या मोहिमेतून अल्पवयीन मुलांमध्ये वाढत असलेले पोर्नोग्राफीचे व्यसन रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. डेल उना वुएल्टा या ग्रुपने पोर्नोग्राफीसंदर्भात सुरु केलेली मोहीम आणि त्यातून आलेली आकडेवारी पाहून पालक हादरले आहेत. या ग्रुपनं ही आकडेवारी सार्वजनिक केल्यावर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी ‘आपत्तीजनक परिस्थिती’ असे वर्णन केले आहे. या आकडेवारीनुसार स्पेनमधील १५ वर्षांखालील मुलांपैकी निम्मी मुले पोर्नोग्राफीच्या संपर्कात आहेत. स्पेनपाठोपाठ रशिया, जर्मनी, स्विडन आणि अन्य देशातही १५ वर्षाखालील मुलांमध्ये पोर्नोग्राफीचे व्यसन लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच रशियाच्या समाजमाध्यमातूनही या ॲपचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच युरोपमधील अशा प्रकारचा पहिला उपक्रम म्हणून या अँपचा उल्लेख करण्यात येत आहे. (Porn Passport)

युरोपियन युनियन 2027 पर्यंत असेच डिजिटल कार्ड सर्वत्र लागू करण्याची योजना आखत आहे. यावरुन संपूर्ण युरोपमध्ये पोर्नोग्राफीनं १५ वर्षाखालील मुलांना आपल्या विळख्यात घेतल्याचे स्पष्ट होत आहे. या अँपनंतर ज्यांना ऑनलाइन पॉर्न पाहायचे आहे त्यांना प्रौढ वेबसाइटसाठी मासिक पास घ्यावा लागेल. त्यांना त्यांचा अधिकृत डिजिटल आयडी वापरावा लागेल. वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाइल फोनवर बीटा डिजिटल वॉलेट ॲप डाउनलोड करावे लागेल. ॲप मोबाईल फोन वॉलेटप्रमाणे काम करेल. ॲप वापरकर्त्याची ओळख आणि त्याचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे याची पडताळणी करेल. वापरकर्त्याला इलेक्ट्रॉनिक डीएनआय किंवा डिजिटल प्रमाणपत्र वापरून त्याची ओळख सिद्ध करावी लागणार आहे. वापरकर्त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करतांना ओळखपत्र, आरोग्य किंवा निवास कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्टचा वापर याचा वापर केला जाणार आहे. प्रौढ व्यक्तीला या प्लॅटफॉर्मवर प्रवेश QR कोडद्वारे दिला जाणार आहे. तो स्कॅन केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. असे करतांना त्या वापरकर्त्याची सगळी माहिती सरकारी नोंदीत जमा होणार आहे. या वापरकर्त्यांना एका महिन्यासाठी क्रेडिट देण्यात येणार आहे. या मासिक पासचे नूतनीकरण करावे लागणार आहे. यामुळे १५ वर्षाखालील मुलांना स्वतःच्या स्मार्टफोनवर पोर्नफिल्म पाहण्यापासूनही रोखण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या पालकांच्या फोनवरही पोर्नोग्राफीचे अँप उघडता येणार नाही.

==================

हे देखील वाचा: WhatsApp Meta AI च्या मदतीने तयार करू शकता आपल्या पसंतीचा फोटो, जाणून घ्या प्रोसेस

==================

स्पनेमधील या पावलाचे जगभरातील सामाजिक संस्थांनी कौतुक केले आहे. स्पेनपाठोपाठ जर्मनीमध्ये पोर्नोग्राफीचे प्रमाण अधिक आहे. जर्मन पोलिसांनी नुकतीच गुन्ह्यांची ताजी आकडेवारी सादर केली. यापैकी ४१.१ टक्के प्रकरणे ही मुले आणि किशोरवयीन मुलांशी संबंधित पोर्नोग्राफिक सामग्री शेअर करण्याशी संबंधित आहेत. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट किंवा इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर असा मजकूर शेअर होत आहे. या आकडेवारीने जर्मनीमध्ये चिंता वाढवली आहे. येथील सरासरी, ११ वर्षांच्या आसपासची मुले पोर्नोग्राफीच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मार्टफोन आणि त्यावरील इंटरनेट याला कारणीभूत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या जर्मन पोलींसांकडे चाइल्ड पोर्नोग्राफीच्या केसेसचा ढीग लागल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे तिथेही स्पेनसारखा अँप आणावा अशी मागणी होत आहे. जर्मनीसोबत युरोपातील अन्य देशांमध्येही अशाच प्रकारे कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात काम करणा-या संस्थांच्या मते पोर्नोग्राफीला वेळीच अटकाव आणला नाही तर देशाच्या तरुण पिढी काही काळानं मानसिक तणावाखाली जाण्याचा धोका आहे. (Porn Passport)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.