Home » पावसाळ्यात केस गळतीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी घरच्याघरी करा हे उपाय

पावसाळ्यात केस गळतीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी घरच्याघरी करा हे उपाय

पावसाळ्याच्या दिवसात केस गळतीची समस्या बहुतांशजणांना उद्भवते. अशातच घरच्याघरी केसांची काळजी कशी घ्यायची याबद्दल जाणून घेऊया...

by Team Gajawaja
0 comment
Hair Problem Tips
Share

Monsoon Hair Care : पावसाळ्याच्या दिवसात केस तुटण्याची समस्या सर्वाधिक असते. यामागील कारण म्हणजे वातावरणातील ओलसरपणा. जर तुम्ही पावसात भिजलात तर केस तुटणे अथवा कोरडे होण्याची समस्या उद्भवली जाते. याच कारणास्तव पावसाळ्यात केसांची काळजी घेणे अत्यावश्यक असते. अशातच जाणून घेऊया पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची याबद्दल सविस्तर…

ऑलिव्ह ऑइलचे तेल
केस तुटण्यापासूनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलच्या तेलाने केसांना मसाज करू शकता. ऑलिव्ह ऑइलच्या तेलात अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे चेहऱ्यासह केसांच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. या तेलाचा वापर केल्याने केस गळतीची समस्या कमी होऊ शकते.

असा करा वापर
-ऑलिव्ह ऑइल
-केसांच्या मूळांना आणि केसांना मसाज करा
-केसांना तेल लावल्यानंतर केस स्वच्छ धुवा
-आठवड्यातून दोनदा ऑलिव्ह ऑइल केसांना लावा

मेथी दाण्याचा हेअर मास्क
केस गळतीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी मेथी दाण्याचा हेअर मास्क लावू शकता. मेथी दाण्यामध्ये काही प्रकारचे गुणधर्म असतात. जे त्वचा आणि केसांना पोषण देण्याचे काम करतात. मेथी दाण्याचा वापर हेअर माक्सप्रमाणे करू शकता. यामुळे केस गळतीची समस्या कमी होऊ शकते. (Monsoon Hair Care)

असा करा वापर
-मेथीचे दाणे भिजवून घ्या
-मेथी दाण्याची पेस्ट तयार करा
-पेस्टमध्ये दहीमध्ये मिक्स करा
-पेस्ट केसांना लावा आणि नंतर केस धुवा
-हा उपाय आठवड्यातून दोनदा करा

या गोष्टींची घ्या काळजी
-पावसात भिजल्यानंतर शँम्पूचा वापर करा
-शँम्पूनंतर कंडीशनरचा वापर करा
-तेलाने केसांना मसाज करा
-हेअर स्ट्रेटनिंग अथवा हेअर कर्लिंग कमीत कमी करा


आणखी वाचा :
मान्सूनमध्ये पिग्मेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी घरच्याघरी तयार करा हे स्क्रब
पायांना पडलेल्या भेगांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी कामी येईल हा घरगुती उपाय

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.