Home » बालपणीच घर सोडून पळाली होती शहनाज गिल, बॉलिवूडमध्ये असे मिळवले यश

बालपणीच घर सोडून पळाली होती शहनाज गिल, बॉलिवूडमध्ये असे मिळवले यश

बॉलिवूडमध्ये शहनाज गिलने आपली एक वेगळी ओखळ निर्माण केली आहे. खरंतर, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा शहनाच गिलचा प्रवास फार सोपा नव्हता.

by Team Gajawaja
0 comment
Shehnaaz Kaur Gill Success
Share

Shehnaaz Kaur Gill Success : शहनाज गिलचे नाव आज प्रत्येकाच्या ओठावर आहे. बिग बॉस हाउसमध्ये आल्यानंतर शहनाज गिलचे नशीबच पालटले गेले आहे. घरोघरी शहनाज गिलला पसंत केले जात आहे. शहनाज गिलच्या स्वभावाने तिचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. पण शहनाज गिलला यशाच्या मार्गापर्यंत पोहणे फार सोपे नव्हते. आयुष्यात अनेक खस्ता खाल्ल्यानंतर आज शहनाज गिलने आपली वेगळी ओखळ निर्माण केली आहे.

बालपणीच घर सोडून पळाली होती
शहनाज गिलचे बालपण अगदी कठीण परिस्थितीत गेले आहे. बालपणीच शहनाजने ठरवले होते मला काहीतरी वेगळे करायचे आहे. याबद्दलचा खुलासा शहनाजने एका मुलाखतीत केला होता. त्यावेळी शहनाज म्हणाली होती, आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूनेच बालपणी घर सोडून पळाली होती. खरंतर, माझा हा निर्णय परिवाराला फार मोठा धक्का देणारा होता. (Shehnaaz Kaur Gill Success)

Shehnaaz Gill Loses Fandom Over Her Arrogant Attitude? Netizens Call Her,  "Itni Gharoor, Itni Rude"

संघर्ष आणि मेहनत केली
घर सोडल्यानंतर शहनाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. लहान-मोठी कामे करुन आपल्या पायांवर शहनाजने उभे राहण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक वेळा अपयशही हाती आले. पण कधीच हार मानली नाही. यानंतर घरातल्यांनीही शहनाज सोबतचे संबंध मोडले होते. याशिवाय पंजाब इंडस्ट्रीने शहनाजला कटऑफ देखील केले होते.

बिग बॉस ते बॉलिवूड
शहनाज गिलचे आयुष्य अशावेळी बदलले जेव्हा तिने बग बॉसच्या घरात एण्ट्री केली. या शोच्या माध्यमातून शेहनाज गिलला वेगळी ओखळ मिळाली. आपला सादेपणा, इमानदारीमुळे शहनाजने प्रेक्षकांची मनं जिकंली. यानंतर शहनाजने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. यावेळी तिची साथ सलमान खानने दिली.


आणखी वाचा :
मिर्झापूर-3 ची कथा नव्हे या 4 कलाकरांमुळे पहावी वेब सीरिज
वडिलांचे सिनेमे फ्लॉप ठरल्याने करण जौहरच्या आईला करावे लागले होते हे काम

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.