Jeans Cleaning in Monsoon : पावसाळ्यात जीन्स घातल्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर चिखल लागणे सामान्य बाब आहे. पण चिखलाचे डाग कपड्यांवरुन सहजासहजी निघत नाही. अशातच चिखलाचे डाग स्वच्छ करताना समस्या येते. जर तुमच्यासोबतही असेच झाले असल्यास जीन्सवरील डाग घालवण्यासाठी पुढील काही सोप्या ट्रिक कामी येऊ शकतात.
चिखलाचे डाग कसे स्वच्छ करायचे?
जीन्सवर लागलेले चिखलाचे डाग दूर करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करू शकता. टिश्यू पेपर चिखल लागलेल्या ठिकाणी हलका दाबून ठेवा. यामुळे चिखलाचे कण टिश्यूला चिकटले जातील. यानंतर पाण्याने जीन्स धुवा. तरीही डाग नसतील जात तर अन्य काही पर्यायाचा वापर करू शकता.
चिखलाचे सुकलेले डाग कसे काढाल?
चिखलाचे सुकलेले डाग काढण्यासाठी तुम्ही बोटांनी खरवडून काढू शकतात. अथवा ब्रशचा वापर करु शकता. पण ब्रशचा वापर करताना अगदी हलक्या हाताने चिखलाच्या डागावर घासा. यानंतर गरम पाण्यात 30 मिनिटांसाठी जीन्स बुडवून ठेवा. आता एका बादलीत थोडे पाणी घेऊन त्यात वॉशिंग पावडर मिक्स करा. यानंतर चिखलाचे डाग लागले आहेत तेथे व्यवस्थितीत घासा. आता स्वच्छ पाण्याने जीन्स धुतल्यानंतर वाळत घाला. (Jeans Cleaning in Monsoon)
स्पंजची मदत घ्या
जीन्सवर लागलेले चिखलाचे डाग काढण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम डिटर्जेंट आणि पाण्याचा घोल करु शकता. जर डाग जात नसतील तर पाण्यात बेकिंग सोडा अथवा व्हिनेगर टाका. या घोलमध्ये स्पंज भिजवून ठेवा आणि नंतर चिखल लागलेल्या ठिकाणी घासा. यानंतर जीन्स पाण्याने धुवून सुकण्यात ठेवा.