Shatrughna Sinha First Love : बॉलिवूडमधील अभिनेता शत्रुघ्न सिन्हांनी काही मोठ्या सिनेमांमध्ये काम केले आहे. आपल्या काळात एक सुपरहिट अभिनेता म्हणून उदयास आलेल्या लिस्टमध्ये शत्रुघ्न सिन्हांचे आवर्जुन नाव घेतले जाते. खरंतर, शत्रुघ्न सिन्हांचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हांची जोडी प्रेक्षकांना फार आवडायची.
शत्रुघ्न सिन्हांची पहिली प्रेयसी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शत्रुघ्न सिन्हांचे पहिले प्रेम रीना रॉय होती. कपलने एकमेकांना सात वर्षे डेट केले होते. पण दोघांचे नाते एका कारणास्तव मोडले गेले. सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष घई यांनी कपलबद्दलच्या काही गोष्टींचा उलगडा केलाय. या दोघांमध्ये मैत्री कशी झाली याबद्दलही घई यांनी सांगितले आहे.
घई यांनी शत्रुघ्न सिन्हांच्या रिलेशनशिपचा केला खुलासा
सुभाष घई यांनी एका मुलाखतीवेळी म्हटले की, कालीचरण सिनेमात पहिल्यांदा रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा काम करणार होते. या सिनेमाचे शूट संपल्यानंतर दोघांमध्ये जवळीकता अधिक वाढली गेली. यानंतर शत्रुघ्न सिन्हांना बहुतांश सिनेमे रीन रॉयसोबतच करायचे होते. (Shatrughna Sinha First Love)
या कारणास्तव मोडले नाते
काही रिपोर्ट्सनुसार, कपलला एकमेकांसोबत लग्न करायचे होते. पण दोघांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर एकमेकांपासून विभक्त झाले. यानंतर कधीच दोघांनी एकेमकांकडे मागे वळून पाहिले नाही.