Home » बिहार मध्ये १७ दिवसांत १२ पूल नदीत पोहायला उत्तरले

बिहार मध्ये १७ दिवसांत १२ पूल नदीत पोहायला उत्तरले

by Team Gajawaja
0 comment
Bihar Tragedy
Share

भारतात पूल कोसळण्याचा ट्रेंड फार पूर्वीपासून सुरू आहे आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूल कोसळतात. पण बिहारमध्ये चक्क १७ दिवसात १२ पूल नदीत वाहून गेले आहेत. ही गोष्ट जेवढी गंभीर आहे तेवढचं बिहार मध्ये विनोदाचं कारणं ठरते आहे. काय आहेत बिहार मध्ये पूल कोसळण्याची कारण?

बिहार मधून अनेक बिहारवासी महाराष्ट्रात स्थलांतरित होत असतात. तसच आता बिहार मधल्या पूलांनी बिहार मधून पलायन सुरू केलयं. एका तिरावरून दुसऱ्या तिरावर जाण्यासाठी असणारे हे पूल स्वत:च नदीपत्रात उड्या घेतायेत. पूल पडण्याविषयी प्रश्न विचारल्यावर बिहार सरकार ह्या प्रश्नांशी किनारा करताना दिसतयं. १७ दिवसात १२ पूल नदीत वाहून गेले आहेत. काय आहे ह्याच्या मागचं कारण ? बिहारच्या पूलांनी पूल मुक्त बिहार हे आंदोलन का सुरू केलंय. (Bihar Tragedy)

बिहारचा आणि पूलांचा ३६ चा आकडा आहे, काही महिन्यांपूर्वी बिहारमधून ६० फुट लांब पूल चोरी केल्याच्या बातम्या चर्चेत होत्या चोरांनी यांत्रिकी विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून JCB आणि गॅस कट्टरच्या सह्ह्याने ६० फूटी पूल लंपास केला होतो. आता पावसाळा येताचं बिहार मधले पूल डोमिनोज खेळा सारखे एकानंतर एक कोसळू लागलेत. पूल कोसळण्याच्या घटना सिवान, सारण, मधूबनी, अररिया, पूर्व चंपारण आणि किशनगंज जिल्ह्यात पाहायला मिळाल्यात. केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी ह्यांनी पूल कोसळण्यासाठी पावसाला धारेवर धरलयं त्यांच्या म्हणण्यानुसार अतिवृष्टीमुळे हे पूल कोसळत आहेत.

तर जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी पूल कोसळण्याच्या घटनांना जबाबदार गाळ काढण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अभियंता आणि कंत्राटदारांना ठरवलयं यातील बहुतांश पूल 30 वर्षे जुने असून त्यांचा पाया उथळ होता जो गाळ काढण्याच्या दरम्यान नष्ट झाला पूलालाच गाळ समजल्यामुळे ह्यामुद्यात सध्यातरी अभियंता आणि कंत्राट दारचं जबाबदार आहेत. (Bihar Tragedy)

बघायला गेलं तर पूल कोसळण्याचे खूप कारण आहेत, पूलाच डिझाईन, पूल बनवताना वापरलेले निकृष्ट साहित्य, निष्काळजीपणा आणि पूलांचे वेळेवर ऑडिट न होणे आणि कधी कधी अतिवृष्टि मुळे ही किंवा पूरामुळे ही पूल वाहून जातो. पण बिहार मधले पूल का वाहून जाताय हे शोधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रस्ते बांधकाम विभाग आणि ग्रामीण बांधकाम विभाग यांना राज्यातील सर्व जुन्या पूलांचे तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय ज्या पूलांना दुरुस्तीची गरज आहे त्यांची तातडीने दुरस्ती करण्याचे आदेश दिले. (Bihar Tragedy)

==================

हे देखील वाचा: 130 जणांचा जीव घेणारा बाबा आहे तरी कोण ?

==================

अहवाला पहायचा झालं तर पूल कोसळण्याच्या घटनांमध्ये ८० % घटना नैसर्गिक आपत्तींमुळे घडतात तसचं १० % पूल बांधकामात वापरण्यात आलेल्या निकृष्ट सामानामुळे आणि 2.19 टक्के मानवनिर्मित आपत्तींमुळे पण ह्या पूल कोसळण्याच्या आपत्तींमुळे बिहारवासी मानवनिर्मित विनोद घडवून आणत आहेत. कोणी म्हणतय पूल कोसळले नाही तर त्यांना उकडत होतं म्हणून त्यांनी नदीत उडी घेतली तर कोणी म्हणतय बिहारला पूलमुक्त बिहार म्हणून घोषित करा. यातून एवढचं कळतयं की परिस्थिती जेवढी danger आहे. त्यापेक्षा जास्त बिहार वासियांमध्ये humor आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.