Home » कामाख्या देवीचं मंदिर म्हणजे एक शक्तीपीठ !

कामाख्या देवीचं मंदिर म्हणजे एक शक्तीपीठ !

0 comment
Festival of Menstruation
Share

भारत ही देवी-देवतांची भूमी ! याच देवतांच्या भूमीवर आपण सर्वांनीं देवी सतीच्या ५१ शक्तिपीठांबद्दल ऐकलंच असेल. यातीलच एक शक्तीपीठ म्हणजे आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचं मंदिर ! या मंदिराबाबत अनेक चमत्कारिक कथा सांगितल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे इथे देवीला मूर्तीमध्ये नाही तर तिच्या योनीच्या रूपात पुजलं जातं. आणि म्ह्णूनच याला योनिपीठ असही म्हणतात. याच मंदिरात ३ दिवसांचा अंबूबाची मेळाही भरतो ज्याला Festival of Menstruation असंही म्हणतात. कामाख्या देवीला येणा-या वार्षिक पाळीचा हा उत्सव स्त्री शक्तीच प्रतिक मानला जातो. सनातन परंपरेत अंबुबाची जत्रेला विशेष महत्त्व आहे. (Festival of Menstruation)

कामाख्या मंदिर हे गुवाहाटीच्या नीलांचल पर्वतरांगेत वसलेलं आहे. पुराणांनुसार भगवान शंकर जेव्हा सती मातेचे शव घेऊन संपूर्ण जगात भ्रमंती करत होते. तेव्हा विष्णूने सतीचे ५१ तुकडे केले आणि ते जिथे जिथे पडले त्या ठिकाणांना शक्तीपीठ म्हणून संबोधलं जातं. तर असच कामाख्या मातेचं मंदिर हे शक्तीपीठ आहे जिथे मातेची योनी आहे. हे एक प्रमुख शक्तीपीठ मानलं जात. सती मातेची योनी नीलांचल पर्वतावर जाऊन पडली आणि त्यानंतर तिने दगडाचं स्वरूप घेतल. त्यामुळे या मंदिरात आता हि दगडाच्या स्वरूपातील योनी आहे. पुढे देवी सतीच्या मृत्यूनंतर भगवान शंकर एका बेटावर जाऊन तपस्या करत होते आणि त्याचवेळी तारकासुर नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकात हाहाकार माजवायला सुरवात केली.पण कोणतेही देव त्याला थांबवू शकत नव्हते कारण तारकासुराने ब्रह्मदेवाकडून वरदान मागितलेल होतं की, त्याचा मृत्यू भगवान शंकराच्या मुलाकडूनच झाला पाहिजे पण आता हे शक्यच नसत.

याचाच फायदा घेऊन तो स्वर्गलोकात सर्व देवीदेवतांना कैद करतो आणि स्वतःला नवीन इंद्र घोषित करतो. अशावेळी आता त्याला आवरणार कोणीच नसत. आता एकच रास्ता असतो ते म्हणजे भगवान शंकरांची तपस्या भंग करणे. पण हे काम करायला सुद्धा कोणीच तयार नसत मग शेवटी हि जबाबदारी कामदेवावर येते. कामदेव एक फुलाचा बाण शंकरांवर फेकतो इकडे शंकर क्रोधीत होतात आणि त्यांचा तिसरा डोळा उघडतो. ते कामदेवाला भस्मसात करून टाकतात. त्यानंतर कामदेवाची पत्नी रती रडायला लागते आणि शंकरांना विनंती करते कि तिचा पती तिला परत मिळावा. भगवान शंकर तिची विनंती पूर्ण करतात. ते कामदेवाला जिवंत तर करतात पण त्यांचं भस्म केलेलं शरीर परत नाही येत. (Festival of Menstruation)

त्यानंतर शंकर कामदेवाला सांगतात कि ‘नीलांचाल पर्वतावर जाऊन देवी योनीची पूजा कर’. त्यानंतर कामदेव आणि त्यांची पत्नी रती पूर्ण श्रद्धेने देवी योनीची पूजा करतात आणि मग कामदेवाला त्याचं देखणं शरीर पुन्हा मिळत. त्यानंतर कामदेव तिथे मंदिराची स्थापना करतात म्ह्णूनच या मंदिराला ‘कामाख्या’ हे नाव पडलं. त्याचबरोबर ज्या बेटावर बसून भगवान शंकरांनी तपस्या केलेली ते बेट आजही इथेच आहे. याच्या टोकावर भैरव बाबांचं मंदिर आहे, आणि असं मानलं जात कि हा या शक्तिपीठांचा रखवाला आहे त्यामुळे इथे असलेल्या उमाशंकर मंदिराला भेट दिल्याशिवाय कामाख्या मंदिर ची यात्रा पूर्ण होत नाही असं म्हणतात.

तस बघितलं तर इथे नेहमीच भक्तांची मांदियाळी असते पण वर्षातील ५ दिवस इथे भक्तगण जास्त असतात.आणि हे दिवस म्हणजे देवीच्या मासिक धर्माचे ५ दिवस आणि यालाच एका पद्धतीने सेलिब्रेट करायला इथे अंबूबाची मेळ्याचं आयोजन केलं जात. यावर्षी २२ ते २५ जून दरम्यान हा अंबूबाची मेळा पार पडला. या मेळ्यादररम्यान मंदिराचा दरवाजा बंद केला जातो आणि आतमध्ये जमिनीवर पांढऱ्या रंगाचा फडका अंथरला जातो जेव्हा ५ दिवसांनंतर मंदिर उघडलं जात तेव्हा हा फडका पूर्णतः ओला आणि लाल रंगाचा झालेला असतो. या कपड्याला अंबूबाची वस्त्र असं म्हटलं जात आणि याचे तुकडे करून भक्तांना प्रसाद म्ह्णून दिला जातो. (Festival of Menstruation)

भक्तांच्या म्हणण्यानुसार हा कापड देवीचा आशीर्वाद असतो आणि लोक याला घरी आपल्या देव्हाऱ्यात ठेवतात. पण या मंदिराबद्दल असणारी अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथे योनीच्या रूपातील दगडाची जी पूजा केली जाते तीथे कायम पाणी वाहत असत पण हे पाणी कोठून येतय, हे अजून कोणालाच सांगता आलेला नाही. अंबूबाची वस्त्रासोबतच हे पाणी सुद्धा भक्तांना प्रसाद म्हणून दिल जात. त्याचबरोबर असं म्हणतात कि यावेळी म्हणजे या ५ दिवसात ब्रह्मपुत्रा नदीच पाणीसुद्धा लाल रंगाचं वाहतं.

आता याबद्दल सांगायचं झालं तर असं म्हटलं जात कि या दिवसात देवीला येणाऱ्या मासिक धर्मामुळे हे पाणी लाल रंगाचं वाहत तर काही जण सांगतात कि पुजारी नदीत सिंधूर टाकून पाणी लाल करतात. काही वैज्ञानिक संशोधानुसार इथल्या मातीत iron जास्त असल्यामुळे हे पाणी लाल होत असं म्हटलं जात. पण जर खरंच असं असेल तर मग हे वर्षातले फक्त ५ च दिवस का होत? पण कारण काहीही असो एक मात्र नक्की कि हे मंदिर आपल्याला दाखवून देतं कि मासिक पाळी हि एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि यात अजिबात शरमेचं वाटायचं कारण नाही. (Festival of Menstruation)

आता प्रश्न हा आहे कि ५ दिवस मंदिर बंद असताना सुद्धा भक्त इथे का येतात. कारण हे ३ दिवस म्हणजे फक्त देवीचा मासिक धर्माशी निगडित नसून तांत्रिक विद्येशीसुद्धा संबंधित आहे. या ५१ शक्तिपीठांपैकी ४ शक्तीपीठ अशी आहेत जिथे तंत्रसाधना केली जाते. कामाख्या मंदिर त्यातलच एक मंदिर आहे. या देवीची तांत्रिकांची देवी म्हणूनही ख्याती आहे. कालिका पुराणानुसार कामाख्या देवी ही दहा महाविद्यांचा अवतार मानली जाते. त्यामुळे तांत्रिक लोक याची पूजा करतात आणि म्हणूनंच अंबूबाची मेळ्यात हे तांत्रिक आणि अघोरी मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी हा मेळा इतका महत्वपूर्ण आहे कि वर्षभर इतर ठिकाणी असणारे अघोरी यावेळी इकडे येतात यामुळेच ह्या ३ दिवसात इथे एक वेगळीच energy जाणवते.

==================

हे देखील वाचा: ही नवरात्र ९ दिवस नाही तर १० दिवस साजरी होणार

==================

हे तांत्रिक आणि अघोरी आपली शक्ती वाढवण्यासाठी या देवीची पूजा करतात. त्याचबरोबर इथे साधू भूतप्रेत यांचा खात्मा करण्यासाठी एक विशिष्ट पूजा पण करतात. याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातलीच एक पद्धत म्हणजे पशुबळी. पण यामध्ये female पशूंना बळी देण्यावर सक्त मनाई आहे. पण हा बळी देण्यासाठी या आवारात एक विशिष्ट्य जागा आहे आणि अनेक लोक हा बळी देताना त्या पशूला बघण्यासाठी उत्सुक असतात कारण इथे असं मानलं जात कि जो बळी दिला जात असेल ते बघणारा माणूस वर्षभर आनंदी सुखी समाधानी राहतो. (Festival of Menstruation)

या बरोबरच इथे वशीकरण पूजा देखील केली जाते. याच्या माध्यमातून आपण कोणालाही वश करू शकतो. दरवर्षी पावसाळ्यात या देवीची प्रतिष्ठापना केली जाते. अंबुबाची मेळा पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेतील आषाढ महिन्यात साजरा होणारा उत्सव आहे. या सणाचा उद्देश हा पृथ्वी मातेच्या सुपीक समृद्धीचा सन्मान करणे हा आहे. याच महिन्यात धान्याची पेरणी केली जाते. कामाख्या देवीशी संबंधित इतर अनेक आख्यायिका आहेत. कालिका पुराणानुसार, देवीला काली मातेचा अवतार देखील मानले जाते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.