Vastu Shashtra : वास्तुशास्रात यंत्रांचे विशेष महत्व असते. या यंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढला जातो आणि नकारात्मक उर्जा दूर होते. यंत्र वेगवेगळ्या धातू, रत्न आणि मंत्रांपासून तयार केले जातात. याचा वापर घर, कार्यालय आणि अन्य ठिकाणी स्थापन केल्याने व्यक्तीच्या सौभाग्यात वृद्धी होऊ शकते.
याशिवाय ग्रहांची स्थिती आपल्या आयुष्याला प्रभावित करते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह दोष असल्यास यंत्रांचा वापर करुन दोष दूर करू शकता. यंत्रांची स्थापना केल्याने व्यवसायात यश मिळते. यंत्रांची स्थापना केल्याने आरोग्यातही सुधारणा होते. याशिवाय यंत्रांची स्थापना करण्यासाठी मनाला शांती मिळते. अशातच जाणून घेऊया सूर्य यंत्र स्थापन करण्यासाठी योग्य दिशा कोणती याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
घरात कोणत्या दिवशी सूर्य यंत्र स्थापन करावे?
वास्तुशास्रानुसार सूर्य यंत्र घराच्या पूर्व दिशेला लावावे. पूर्व दिशा सुर्योदयाची मानली जाते. याला उर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. यामुळे सुर्यदेवाची कृपा राहते आणि व्यक्तीच्या आयुष्यात मान-सन्मान, यश आणि सकारात्मकतेचा संचार होतो.
या गोष्टींची घ्या काळजी
-यंत्र भींतीवर अशाप्रकारे स्थापन करा ज्याचे मुख पूर्व दिशेला असावे
-यंत्र एखाद्या उंच ठिकाणी, जसे की, पूजेचे ठिकाण अथवा लिव्हिंग रुम
-यंत्र स्थापन करण्याआधी उत्तम पद्धतीने स्वच्छता करा
-यंत्राची स्थापना करताना मंत्रांचा जाप करावा
-यंत्र स्थापन केल्यानंतर त्याची दररोज पूजा करा
सूर्य यंत्र स्थापन केल्याने होणारे लाभ
घरात सूर्य यंत्र स्थापन केल्याने घरात सकारात्मक उर्जा आणि समृद्धी येते. यामुळे आरोग्य सुधारले जाते. याशिवाय नकारात्मक उर्जा दूर होते. सूर्य मंत्र स्थापन केल्याने मानसिक शांतीही मिळते. (Vastu Shashtra)
सूर्य मंत्राची पूजा कशी कराल?
सूर्य मंत्राची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम स्नान करुन स्वच्छ वस्र परिधान करा. यंत्र एका स्वच्छ कापडावर ठेवावे. यंत्राजवळ एक दिवा आणि धूप लावा. भगवान सूर्याच्या मंत्रांचा जाप करून पूजा करावी.