Mirzapur Season 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. प्रत्येकजण रिलीज डेट जवळ येण्याची वाट पाहत आहे. मिर्झापूरचे याआधीच्या दोन सीझनने प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. अशातच तिसऱ्या सीझनमध्ये काय होणार हे पाहण्यास प्रेक्षक आतुर आहेत. काही दिवसांपूर्वी सीरिजचा एक टीझर लाँच केला होता. त्यानंतर आता मिर्झापूरमध्ये पंचायत-3 मधील स्टार एण्ट्री करणार असल्याची पुष्टी चक्क गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजलने केली आहे.
पंचायतच्या स्टारची एण्ट्री
मिर्झापूरचा तिसरा सीझन येत्या 5 जुलैला प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सीरिजमध्ये नव्या कलकारांसंदर्भात काही अपडेट्सही समोर येत आहेत. आता पंचायतच्या तिसऱ्या सीझनमधील कलाकारांबद्दल अपडेट आले आहे. पंचायतमधील कलाकार जितेंद्र कुमार उर्फ सचिव जी मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहेत.
कोणती भूमिका साकारणार?
जितेंद्र कुमार मिर्झापूरमध्ये कागदोपत्री कारवाईसाठी मिर्झापूरमध्ये येणार आहे. कारण त्याला कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) च्या मृत्यूबद्दल पुरावे जमा करायचे आहेत. (Mirzapur Season 3)
View this post on Instagram
विजय वर्माच्या भूमिकेत बदल
विजय वर्माने नुकत्याच मिर्झापूरमधील आपल्या भूमिकेबद्दल काही गोष्टी उलगडल्या आहेत. विजय वर्माने म्हटले की, मिर्झापुरच्या दुसऱ्या सिझनमध्ये जुळ्या भावाची भूमिका साकारली होती. एका अभिनेत्याच्या रुपात पाहायचे झाल्यास दोन भूमिका साकारणे आव्हानात्मक होते. यामुळे वेगळ्या गोष्टी पाहणे आणि एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी वेगळा दृष्टीकोनही मिळाला. पण तिसऱ्या सीझनमध्ये सर्वाधिक मोठे आव्हान असे की, दोघांनाही एकाच भूमिकेत साकारायचे आहे. या सीझनमध्ये हे पाहणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे.