Home » सौंदर्य कमी करणारे डार्क सर्कल ‘या’ उपायांनी करा कमी

सौंदर्य कमी करणारे डार्क सर्कल ‘या’ उपायांनी करा कमी

by Jyotsna Kulkarni
0 comment
dark circles treatment
Share

प्रत्येक व्यक्तीसाठी आपला चेहरा आणि आपल्या चेहऱ्याची सुंदरता महत्वाची असते. सगळेच सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात. कलाकारणसाठी गुळगुळीत आणि सतेज त्वचा आणि सौंदर्य आपल्याकडे असावे हि सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र आपल्या चेहऱ्याला खराब करणारी एक समस्या म्हणजे, डोळ्या खाली येणारी काळी वर्तुळे. याला आपण डार्क सर्कल्स देखील म्हणतो. हेच डार्क सर्कल्स आपले सौंदर्य खराब करतात. हे कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी विविध उपाय उपलब्ध आहेत. हे सर्कल्स येण्याची अनेक कारणं आहेत. सोबतच ही सर्कल्स कमी करण्यासाठी घरच्याघरी देखील अनेक उपाय आहेत. चला तर या लेखात याबाबद्दलची माहिती जाणून घेऊया. (dark circles treatment )

ही डार्क सर्कल होण्याच्या अनेक कारणे आहेत. ज्यात मुख्यत्वे झोप कमी होणे, शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता आणि तणाव ही आहेत. याशिवाय शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडणे, डोळ्यांवरील ताण, खराब जीवनशैली आणि चुकीच्या सवयी, ऍलर्जी, वृद्धत्व, थकवा, अनुवंशिकता, प्रखर सूर्यकिरणं, त्वचा सैल पडणे, त्वचेखालील फॅट्सचे प्रमाण, जास्त काळ इलेक्ट्रॉनिक्सचा वापर, डोळे चोळणे, डोळ्यांचा मेकअप नीट न धुणे आदी कारणं देखील या डार्क सर्कल्स येण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसतात.

dark circles treatment

आपले सौंदर्य कमी करणाऱ्या या डार्क सर्कल्सपासून बचाव करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक उत्पादन आहेत. मात्र त्याचा वापर खरंच योग्य असू शकतो का? अनेकदा बरेच लोकं घरगुती उपचारांना प्राधान्य देतात. जेणेकरून यात धोका कमी, खर्च कमी असतो आणि उपयोग झाला नाही तरी तोटा देखील होत नाही. म्हणूनच आपण या लेखातून आता या डार्क सर्कल्सवर घरगुती उपचार जाणून घेऊया.

बटाट्याचा रस :
आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असणारा बटाटा देखील या दार सर्कल्सवर उपयुक्त ठरू शकतो. या बटाट्यामुळे टॅनिंग, पिगमेंटेशन आणि डार्क सर्कल्स आदी समस्या बऱ्याच प्रमाणात आपण कमी करू शकतो. आपण बटाट्याचा रस कापसाच्या मदतीने डोळ्याभोवती लावल्याने ही समस्या बरीच अंशी कमी होऊ शकते. मात्र हा रस डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. बटाट्यामध्ये, बटाट्याच्या रसात स्टार्च मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे जर आपण दररोज न चुकता त्वचेवर बटाट्याचा रस लावला तर काही दिवसातच आपल्याला चांगले बदल दिसू लागतील.

dark circles treatment

काकडीचा रस :
आपल्याला तर माहीतच आहे, काकडी डोळ्यांसाठी किती चांगली आणि डोळ्यांना थंडावा देणारी आहे. डोळ्यांच्या त्वचेखाली ओलावा नसेल तरीही या डार्क सर्कल्सची समस्या येते. अशावेळेस काकडीचा रस काढून तो डोळ्यांखाली लावावा त्यामुळे ही डार्क सर्कल्स दूर करू शकता. सोबतच जर डोळ्यांवर काकडीचे तुकडे ठेवले तरीही याचा चांगला फरक दिसून येतो. त्वचा, केस आणि आरोग्यासाठी काकडी फायदेशीर आहे. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असते. त्यामुळे अनेकदा उन्हाळ्यात काकडीचे सेवन करण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो.

कोरफड जेल :
कोरफड ही अनेक आजारांमध्ये आणि सौंदर्याच्या समस्यांमध्ये उपयुक्त ठरते. तिचे औषधी गुणधर्म तर असंख्य आहेत. हाच कोरफडीचा गर अर्थात ऍलोवेरा जेल आपल्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतो. त्याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचा चांगली करण्यास मदत करतात. या गरीमुळे मृत पेशी दूर होऊन आपला चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो. डोळ्याखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर डोळ्याभोवती चोळा. हा रस तुम्ही घरी मिक्सरच्या भांड्यात बनवून तो लावू शकता. किंवा बाहेरून विकत आणुन देखील लावू शकता.

dark circles treatment

ग्रीन टी बॅग :
डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी ग्रीन टी देखील उत्तम पर्याय आहे. यात हायड्रेटिंग गुणधर्म असतात आणि ते त्वचेच्या दुरुस्तीसाठी देखील मदत करतात. यासाठी तुमच्या डोळ्यांवर ग्रीन टीच्या आपलेल्या बॅग ठेवू शकता.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.