Relationship : बॉलिवूडमधील सिनेमांमध्ये दाखवलेले प्रेम प्रत्येकाला आपले रिलेशनशिपही त्याप्रमाणे असावे असे स्वप्न दाखवते. याच्या माध्यमातून आपण पार्टनरकडे कधीकधी आपण अधिक अपेक्षाही करतो. काहीजणांना तर एकतर्फी प्रेम होते आणि यामध्ये ऐवढे बुडले जातात की, आयुष्यात पुढे काय करावे हे कळत नाही. एकतर्फी प्रेमातून व्यक्तीचे मानसिक आरोग्यच नव्हे तर भविष्यही धोक्यात येते. खरंतर एकतर्फी प्रेम केवळ सिनेमा आणि कथांमध्येच उत्तम वाटते. पण खऱ्या आयुष्यात एकतर्फी प्रेमामुळे प्रत्येक क्षण वाईट असल्याचे काहींना वाटते. जाणून घेऊया एकतर्फी प्रेमामुळे कोणत्या समस्या आयुष्यात उद्भवू शकतात याबद्दल सविस्तर…
-डिप्रेशनचा शिकार होतो व्यक्ती
प्रेमात पडलेला व्यक्ती पार्टनरसोबत प्रत्येक दु:ख विसरुन जातो. पण एकतर्फी प्रेमातील व्यक्तीला सातत्याने नकाराचा सामना करावा लागत असल्याने हळूहळू डिप्रेशनचा सामना करावा लागतो. अशातच व्यक्ती सातत्याने आवडत असलेल्या व्यक्तीच्या नकाराबद्दल विचार करत अत्याधिक तणाव घेण्यास सुरुवात करतो.
-एंग्जायटी अटॅक
एकतर्फी प्रेमातील व्यक्ती अशा व्यक्तीबद्दल सतत विचार करत असेल जो त्याला सतत नकार देतोय तर तो एंग्जायटीचा शिकार होऊ शकतो. प्रेमाच्या नादात व्यक्तीला चूक आणि बरोबर काय हे कळत नाही. एवढेच नव्हे नकारात्मक विचार करत राहिल्याने याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. (Relationship)
-नकारात्मक विचार
सातत्याने समोरच्या व्यक्तीने नकार दिल्याने व्यक्ती एवढा हताश होतो की, स्वत:बदलही तो नकारात्मक विचार करू लागतो. आपले प्रेम मिळवण्यासाठी व्यक्ती आपल्या खासगी आणि प्रोफेशनल करियरलाही धोक्यात आणतो.