Kerala famous places : बहुतांशजणांना वेगवेगळ्या ठिकाणांना फिरायला जायची फार आवड असते. पण काम आणि ऑफिसमुळे कुठे जाता येत नाही. पण आयुष्यात एकदातरी अशी काही ठिकाणे आहेत जेथे तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. तर जाणून घेऊया केरळातील अशी कोणती ठिकाणे आहेत जेथे फिरायला जाऊ शकता.
कयाकिंगचा आनंद घ्या
केरळातील सर्वाधिक सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे अल्लेपी आणि कुमारकोम येथे कयाकिंगची मजा घेऊ शकता. यावेळी तुम्ही पहिल्यांदा कयाकिंग करणार असल्यास एखाद्या व्यक्तीला घेऊन करा. अन्यथा पाण्यात बुडण्याची शक्यता अत्याधिक असते. केरळातील प्रसिद्ध अॅक्टिव्हिटींपैकी कयाकिंग एक आहे.
तराफा राफ्टिंग
केरळात जाऊन तुम्ही तराफा राफ्टिंग केली नाही तर तुमची ट्रिप अपूर्ण राहिल्यासारखी आहे. मित्रांसोबत तराफा राफ्टिंग करण्याची एक वेगळीच मजा येते. केरळात तराफा राफ्टिंग तुम्हाला थेक्कडी, वायनाड आणि कुट्टनाड सारख्या ठिकाणी करु शकता. (Kerala famous places)
चेम्बरा पीक ट्रेक
वायनाडमधील सर्वाधिक सुंदर अशा ट्रेकपैकी एक म्हणजे चेम्बरा पीक ट्रेक आहे. तुम्ही फिट असाल तर ट्रेकच्या टोकापर्यंतही पोहोचू शकता. समुद्र सपाटीपासून 2100 मीटर उंचवर ट्रेक आहे. जंगल सफारीचा आनंदही या ट्रेकवेळी घेता येईल. आयुष्यात काही अॅडव्हेंचर गोष्टी करणार असाल तर नक्कीच चेम्बरा पीक ट्रेक करू शकता.