आपल्या देशात बॉलिवूड सेलिब्रिटीज किंवा मोठमोठ्या उद्योगपतींच्या घरचं लग्न हे एका सोहळ्यापेक्षा कमी नसतं. या सेलिब्रिटीजच्या लग्नाचा एक वेगळाच थाट असतो.
काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाचा प्री-वेडींग सोहळाच किती भव्य होता हे आपण सगळ्यांनीच पाहिलं, आता त्यांच्या लग्नातसुद्धा याहून दुप्पट थाट-बाट पाहायला मिळणार आहे.
या लगिनघाईत आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव गेल्या काही दिवसांपासून समोर येतंय ते म्हणजे सोनाक्षी सिन्हाचं. (Sonakshi Sinha Wedding)
सोनाक्षी लवकरच तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड जहिर इकबालबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. इतकंच काय तर या दोघांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलीये.
यामुळे सोनाक्षीवर टीकाही होताना दिसत आहे. काहींनी याचं कनेक्शन लव्ह जिहादशीही लावलं आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून. (Sonakshi Sinha Wedding)
काही मीडिया रीपोर्टनुसार येत्या २३ जूनला सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड जहिर इकबालशी लग्न करणार असल्याची बातमी समोर आली. या दोघांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रेडिट या वेबसाइटवर या लग्नाची पत्रिका शेयर करण्यात आली आहे. एका मॅगजीनच्या मुखपृष्ठाच्या स्टाइलमध्ये ही पत्रिका छापली गेली असून त्यावर लग्नाचे ठिकाण, वेळ तसेच सोनाक्षी व जहिरचा फोटोही आहे. याबरोबरच “अफवा सत्यात उतरल्या” असा मेसेजही त्यावर लिहिण्यात आला आहे.
या पत्रिकेवर एक ऑडिओ क्युआर कोड आहे आणि तो स्कॅन केल्यावर सोनाक्षी जहिरच्या आवाजातला एक इनव्हीटेशन मेसेजही ऐकायला मिळतोय. या लग्नात फक्त काही जवळच्या व्यक्तींना बोलावलं जाणार असून त्यांना खास फॉर्मल ड्रेसमध्ये यायची सूचना या पत्रिकेत केलेली आहे. मुंबईतील बास्टियन इथे हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं जातंय. (Sonakshi Sinha Wedding)
===
हेदेखील वाचा : अजित पवारांवर एवढी नामुष्की का ओढवली?
===
इतकंच नव्हे तर सोनाक्षी लग्नानंतर इस्लाम धर्म कबूल करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर सोनाक्षी लव्ह-जिहादसारख्या गोष्टींना खतपाणी घालतीये अशीही चर्चा पाहायला मिळत आहे.
कुठलीच गोष्ट स्पष्ट झालेली नसली तरी सोशल मीडियावर मात्र लोकांनी सोनाक्षीलाच दोष द्यायला सुरुवात केली आहे. तिच्या घरच्या संस्कारांवरही लोक टीका करू लागले आहेत.
अजून सोनाक्षी किंवा जहिर यांच्यापैकी कुणीच या बातमीची पुष्टी केलेली नाही. या अशा अफवांकडे फारसं लक्ष देत नसल्याचं सोनाक्षीने ‘आय दिवा’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. (Sonakshi Sinha Wedding)
“मी या गोष्टी एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. सर्वप्रथम माझ्या लग्नाबद्दल चर्चा करणं हे कोणाचं काम नाही, दुसरी गोष्ट म्हणजे ही माझी वैयक्तिक निवड आहे. माझ्या आई-वडीलांपेक्षा लोकच जास्त माझ्या लग्नाची चर्चा करतायत. मला याची सवय झालीये.” असं सोनाक्षीने याबद्दल वक्तव्य केलं.
सोनाक्षी पाठोपाठ तिचे वडील म्हणजेच दिग्गज अभिनेते व बॉलिवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील यावर भाष्य केलंय.
ते सध्या दिल्लीत असून त्यांचं त्यांच्या मुलीशी याबाबतीत काहीच बोलणं झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. “जेव्हा केव्हा ती या निर्णयाबद्दल आम्हाला सांगेल तेव्हा आम्ही तिला आशीर्वादच देऊ, ती आनंदी राहावी हीच आमची इच्छा आहे.” असं वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘टाइम्स नाऊ’शी संवाद साधताना केलं. (Sonakshi Sinha Wedding)
एकूणच सोशल मीडियावर जरी काहीही बोललं जात असलं तरी तूर्तास सोनाक्षी आणि तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी या चर्चेला पूर्णविराम दिलाय. पण भविष्यात खरंच असं जर घडलं तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नसेल हे मात्र नक्की.