Home » तुमचा मोबाइल क्रमांक बंद होणार? सरकारने अलर्ट जारी करत सांगितले सत्य

तुमचा मोबाइल क्रमांक बंद होणार? सरकारने अलर्ट जारी करत सांगितले सत्य

सरकारने स्मार्टफोन युजर्सला बनावट कॉल्ससंदर्भात एक अॅलर्ट जारी केला आहे. याशिवाय एक मेसेजही पाठवला आहे.  जर तुम्ही एक स्मार्टफोन युजर असल्यास तर सावध व्हा.

by Team Gajawaja
0 comment
काॅलर ट्यून
Share

Tech News : सरकारने स्मार्टफोन युजर्सला बनावट कॉल्ससंदर्भात एक अॅलर्ट जारी केला आहे. याशिवाय एक मेसेजही पाठवला आहे.  जर तुम्ही एक स्मार्टफोन युजर असल्यास तर सावध व्हा. कारण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने बनावट कॉल्स प्रकरणात एक अॅलर्ट जारी केला आहे. यामध्ये सरकारने म्हटले आहे की, स्कॅमर्स सर्वसामान्य नागरिकांना फोन करुन मोबाइल क्रमांक आम्ही बंद करू अशी धमकी देत आहेत. पण दुसऱ्या बाजूला TRAI ने स्पष्टपणे म्हटले आहे की, टेलिकॉम कस्टर्मकडून मोबाइल क्रमांक बंद करण्यासंदर्भात कोणताही फोन केला जात नाही.

TRAI कडून युजर्सला अॅलर्ट मेसेज
TRAI कडून युजर्सला एक अॅसर्ट मेसेज पाठवण्यात येत आहे. मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनच्या एका विधानानुसार, स्कॅमर्स भारतातील नागरिकांना येथील क्रमांक दाखवून आंतरराष्ट्रीय स्कॅम कॉल करत आहेत. खरंतर, स्कॅमर्स परदेशात बसलेल्या सायबर क्रिमिनिल्स कॉलिंग लाइन आयडेंटिटीमध्ये हेराफेरी करत आहेत.

टेलिकॉम विभागाने सर्विस प्रोव्हाइडर्सला भारतीय लँडलाइन क्रमांकावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय बनावट कॉलला ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रायकडून जारी करण्यात आलेल्या विधानानुसार, जर तुम्हाला टेलिकॉम अथवा ट्रायकडून एखादा फोन आल्यास लगेच तो डिस्कनेक्ट करावा, कारण आम्ही अशाप्रकारचा कोणताही फोन करत नाही. यावर तुम्ही तक्रार देखील दाखल करू शकता. (Tech News)

चक्षुवर करू शकता तक्रार
टेलिकॉम मिनिस्ट्रीच्या मते, अशाप्रकारच्या बनावट कॉलसाठी चक्षु या सुविधेवर तक्रार करू शकता. या पोर्टलवर सायबर गुन्ह्यांव्यतिरिक्त अन्य काही फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी मदत केली जाते.


आणखी वाचा :

10 वर्ष जुन आहे तुमचे आधार कार्ड? UIDAI ने दिलीय मोठी अपडेट

एक चूक आणि बँक खाते रिकामे, फोनमध्ये APP इंस्टॉल करताना या गोष्टी ठेवा लक्षात


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.