Aadhar Card Update : आधार आजच्या काळात काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्डशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही. कोणत्याही शासकीय कामासाठी आधार कार्डची गरज भासली जाते. अशातच तुम्हाला आधार कार्डशी कोणता मोबाइल क्रमांक लिंक आहे हे माहिती नसल्यास तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. अशातच काही सुविधा अशा आहेत की, ज्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांशिवाय त्याचा लाभ घेता येऊ शकतो.
आधार कार्डला कोणता मोबाइल क्रमांक किंवा ईमेल लिंक आहे कसे शोधून काढायचे?
-सर्वप्रथम युआयडीएआयच्या वेबसाइटला भेट द्यावी
-यानंतर ड्रॉप-डाउन मेन्यूमधून ईमेल/मोबाइल क्रमांक वेरिफाइड करण्याचा पर्याय निवडा
-यानंतर मोबाइल क्रमांक वेरिफाइड करा
-यानंतर 12 अंकी आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका
-जर तुमचा फोन क्रमांक आधीच वेरिफाइड असल्यास एक पॉप-अप दिसेल (Aadhar Card Update)
-जर तुम्ही दिलेला क्रमांक उपलब्ध नसल्यास तर एक पॉप-अप दिसेल जो तुम्हाला सांगेल तुम्ही दिलेल्या डेटाशी समान नाही.
जर तुमचा मोबाइल क्रमांक आधार कार्डसोबत रजिस्टर्ड नसल्यास तुम्ही अशा सेवांचा लाभ घेऊ शकता. आधार पीवीसी कार्ड ऑर्डर करण्यासाठी ते आधार पीवीसी स्थिती तपासून पाहण्यासाठीही याचा लाभ घेता येऊ शकतो. याशिवाय एनरोलमेंट आणि अपडेटचे स्टेटसही पाहू शकता.