App Installation Tips : मोबाइलमध्ये ज्यावेळी एखादा अॅप इंस्टॉल करतो त्यावेळी गुगल प्ले स्टोअर अथवा अॅप्पल आयफोनमध्ये अॅप स्टोअरच्य मदतीने अॅप शोधले जातात. पण ज्यावेळी अॅप मिळत नाही त्यावेळी थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मची मदत घेतली जाते. अशातच काही वेबसाइट्स आहेत ज्या APK Files च्या माध्यमातून काही अॅप ऑफर करतात. पण तुम्हाला माहितेय का, अॅप फोनमध्ये इंस्टॉल करण्याचा हा शॉर्टकट तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. अशातच अॅप इंस्टॉल करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया…
कोणत्या चुका करू नये
गुगल प्ले स्टोअर आणि अॅप्पल अॅप स्टोअरवर एखादे अॅप न मिळाल्यास थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मचा वापर करण्यापासून दूर रहावे. थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म तुम्हाला APK Files च्या माध्यमातून अॅप उपलब्ध करून देतात. पण अॅप इंस्टॉल करताना हे विसरून जातो की, अज्ञात साइट्सवरुन काहीही डाउनलोड करणे धोकादायक ठरू शकते.
खरंतर, अज्ञात साइट्सवरुन डाउनलोड केलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये व्हायरस असू शकतो. याव्यतिरिक्त एपीके फाइलच्या माध्यमातून दूरवर बसलेला व्यक्ती तुमच्या फोनला कंट्रोल करू शकतो. अशातच तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. (App Installation Tips)
अॅप इंस्टॉल करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
कोणत्याही अज्ञात लिंकच्या माध्यमातून अॅप इंस्टॉल करण्याएवजी केवळ गुगल प्ले स्टोअर अथवा अॅप्पल अॅप स्टोअरसारख्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. एखादे अॅप न मिळाल्यास थर्ट पार्टीच्या माध्यमातून APK File डाउनलोड करू नये.