Home » बद्रीनाथ धामकडून आला शुभसंदेश

बद्रीनाथ धामकडून आला शुभसंदेश

by Team Gajawaja
0 comment
Badrinath Dham
Share

उत्तराखंडातील चारधाम यात्रा सुरु झाली आहे.  केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री या चारधाम यात्रेसाठी मोठ्यासंख्येनं भाविक उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहेत. या प्रत्येक चारधामांचे आगळे असे वैशिष्ट आहे.  या चारधामांची जेव्हा दरवाजे उघडले जातात, तेव्हाच्या परिस्थितीवरुन देशाचे भविष्य सांगितले जाते. तशीच एक पद्धत बद्रीनाथ मंदिराचे (Badrinath Dham) दरवाजे जेव्हा उघडले जातात, तेव्हा सहा महिन्यापूर्वी ठेवलेल्या देवाच्या वस्तू कशा आहेत, हे प्रथम बघितले जाते. 

यावरुन पुढचे वर्ष कसे जाणार याची भविष्यवाणी केली जाते. यावर्षी बद्रीनाथ धामवरुन देशासाठी खुशखबरी आली आहे.  ती म्हणजे,  देशात यावेळी हवामान चागंले रहाणार असून कुठेही दुष्काळी परिस्थिती येणार नाही. गेली हजारो वर्ष ही परंपरा बद्रीनाथ मंदिरात पाळली जाते.  यासाठी जेव्हा सहा महिन्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतात, तेव्हा हजारोंच्या संख्येनं भाविक तेथे उपस्थित असतात.  भाविकांनी ही भविष्यवाणी ऐकल्यावर बद्रीनाथ भगवान की जय असा जयघोष सुरु केला.  (Badrinath Dham)

बद्रीनारायण मंदिर हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर असलेले चारधाम यात्रेमधील पवित्र मंदिर आहे. भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या मंदिराची निर्मिती,  ७ व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासूनच मंदिरामध्ये काही विशिष्ट परंपरा पाळल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, पुढील वर्षासाठी देशाचे भविष्य. 

यावर्षी भगवान बद्रीनाथांनी शुभसंदेश (Badrinath Dham) दिले असून देशात दुष्काळ पडणार नाही, असा संकेत दिला आहे.  १२ मे रोजी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे मोठ्या पुजाविधीनं उघडण्यात आले.  मंदिराचे दरवाजे उघडताच धामच्या आत दिसलेल्या दृश्यांनी हजारो भाविकांना सुखावले आहे.  या मंदिरात भगवान विष्णुंची बद्रीनारायण रुपात पुजा केली जाते. येथे, शालिग्रामची त्यांची मीटर लांबीची मूर्ती आहे.  ही मुर्ती  नारद कुंडातून काढल्याची माहिती आहे.  प्रत्यक्ष आदि शंकराचार्यांनी व्या शतकात त्याची स्थापना केली आहे. 

याच मुर्तीनं दिलेल्या शुभसंदेशानं आनंदाचे वातावरण पसरले आहे. १२ मे रोजी सकाळी वाजता दरवाजे उघडताच मुख्य रावल, ईश्वर प्रसाद नंबूदिरी यांनी मंदिरात प्रथम प्रवेश केला.  सहा महिन्यांपूर्वी मंदिराचे दरवाजे बंद करण्यापूर्वी गर्भगृहातील भगवान बद्रीनाथांच्या मूर्तीवर तुपाची जाड चादर चढवण्यात आली होती.  म्हणजेच, तुपाचा जाड लेप भगवान बद्रीनाथांच्या मुर्तीवर चढवला जातो.  आता जेव्हा दरवाजे उघडण्यात आले, तेव्हा हा लेप जसाच्या तसा असल्याचे दिसून आले. (Badrinath Dham)

============

हे देखील वाचा : कडाक्याचे ऊन आणि सनस्ट्रोकच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी डाएटमध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

============

देवावर लावलेले तूप जसेच्या तसे मिळणे हे शुभ लक्षण मानले जाते. मंदिराच्या रावल, म्हणजेच पुजा-यांनी हा तुपाचा लेप बघितला आणि आनंद व्यक्त केला.  हा लेप काही वेळा वितळला जातो.  तेव्हा देशात दुष्काळसदृश्य परिस्थिती येईल, असे भविष्य सांगण्यात येते.  मात्र यावेळी तूपाचा लेप जसाच्या तसा होता, त्यामुळे सर्वत्र हवामान चांगले राहून शेती चांगली होईल, असे भविष्य सांगण्यात आले आहे.   


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.