Hair Problem Tips : केसांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा केसांसंबंधित समस्या उद्भवू शकतात. आजकाल बहुतांशजणांमध्ये कमी वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. यावर तुम्ही पुढील काही घरगुती उपाय करू शकता.
पांढऱ्या केसांच्या समस्येवर उपाय
पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे वयाआधीच वृद्धत्व आल्यासारखे वाटते. काहींना पांढऱ्या केसांमुळे सातत्याने चिंता वाटत राहते. यासाठी तुम्ही आवळ्याच्या तेलाचा वापर करू शकता. आवळ्याचे तेल किंवा पावडर केसांना दररोज लावल्याने पांढऱ्या केसांच्या समस्येपासून दूर राहू शकता. याशिवाय कढीपत्त्याच्या वापर केल्याने केसांचे आरोग्यही राखले जाते.
मेथीचे दाणे
केसांसाठी मेथीचे दाणे रामबाण उपाय मानला जातो. यासाठी सर्वप्रथम मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवा आणि याची पेस्ट तयार करा. पेस्ट केसांना 30 मिनिटे लावून ठेवल्यानंतर शॅम्पूने केस धुवा. यामुळे केस गळणे आणि पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळेल. याशिवाय तुम्ही काळ्या चहाचा देखील वापर करू शकता. काळ्या चहाच्या पाण्याने केस धुतल्याने पांढऱ्या केसांच्या समस्येपासून दूर राहू शकता. (Hair Problem Tips)
या गोष्टींची घ्या काळजी
या उपायांव्यतिरिक्त तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. जसे की, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा, धूम्रपान आणि मद्यपानाच्या सेवनापासून दूर राहा. पुरेशी झोप आणि हेल्दी डाएटचे सेवन करा.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)