Home » आता Deepfake बद्दल जाणून घेणे होणार सोपे, Meta करणार हा मोठा बदल

आता Deepfake बद्दल जाणून घेणे होणार सोपे, Meta करणार हा मोठा बदल

आर्टिफिशिल इंटेलिजेंसच्या मदतीने काही कामे सोपी झाली आहेत. पण यामुळे नुकसान देखील होत आहे.

by Team Gajawaja
0 comment
Deepfake
Share

Deepfake : आर्टिफिशिल इंटेलिजेंसच्या मदतीने काही कामे सोपी झाली आहेत. पण यामुळे नुकसान देखील होत आहे. अशातच सध्या डीपफेकचे प्रकरण गाजत आहे. यावर लवकरच तोडगा मेटाकडून काढला जाणार आहे. खरंतर, कंपनी मे महिन्यापासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्सवर आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या मदतीने तयार करण्यात आलेले व्हिडीओ, इमेज आणि ऑडिओसाठी Made with AI चा लेबल लावणे सुरू करणार आहे.

मेटाच्या ओव्हरसाइट बोर्डाकडून असा सल्ला देण्यात आला आहे की, कंपनीला आपल्या अंतर्गत वाढ केली पाहिजे. आजकाल आर्टिफिशिअल इंटेलिजेंसपासून तयार करण्यात आलेले कंटेटला आपल्या नियमात सहभागी करून घेतले पाहिजेत.

मेटाने म्हटलेय की, आम्ही कंटेटमध्ये होणारी हेराफेरी, डीपफेक आणि खोट्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी आमच्या काही नियमांत बदल करणार आहोत. यामुळे एआय टूल्सचा वापर करण्यात आलेल्या कंटेटला लेबल लावले जाणार आहेत. जेणेकरून युजर्सला कळेल की, ही सामग्री एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. (Deepfake)

Made with AI चा लेबल लावणार
मेटाच्या कंटेट पॉलिसी वाइस प्रेसिडेंट मोनिका बिकर्ट यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलेय एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली इमेज, व्हिडीओ अथवा ऑडिओला मेड विथ एआयचा टॅग लावला जाणार आहे. याशिवाय मेटाच्या दुसऱ्या कंपन्यांनी जेनरेटिव्ह एआय टूल्सपासून तयार करण्यात आलेल्या फोटोची ओखळ पटवण्यासाठी एक मार्ग शोधला आहे. पण त्याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. प्राप्त झालेल्या माहितीनुसार हा नियम फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्ससाठी लागू असणार आहे. व्हॉट्सअॅप आणि अन्य सर्विसेजसाठी वेगळे नियम आहेत.


आणखी वाचा :
सोशल मीडियाचा अत्याधिक वापर करणाऱ्या व्यक्ती राहतात नैराश्यात, अभ्यासातून खुलासा
आता वेब युजर्सलाही YouTube Music ऑफलाइन डाउनलोड करता येणार, वापरा ही ट्रिक
नोकरी मिळण्यास अडथळा येत असल्यास या गोष्टी ठेवा लक्षात

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.