Home » तेलकट त्वचेची उन्हाळ्यात अशी घ्या काळजी

तेलकट त्वचेची उन्हाळ्यात अशी घ्या काळजी

उन्हाळयात कडक उन्हासह बदललेल्या वातावरणामुळे त्वचा तेलकट होण्यास सुरूवात होते. ज्यांची त्वचा आधीच तेलकट असते त्यांनी उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

by Team Gajawaja
0 comment
Oily Skin
Share

Oily Skin Care in Summer :  उन्हाळ्याची सुरूवात झाली आहे. या ऋतूत त्वचेची अत्याधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जसे, हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, त्याप्रमाणे उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्वचा तेलकट होऊ लागते. त्वचेवर घाम येणे, त्वचेतून तेल निघणे अशा काही गोष्टी सुरू होतात. अशातच दिवसभर घराबाहेर राहिल्यास त्वचेवर धूळ-माती चिकटली जाते. यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या वाढली जाते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही पुढील काही उपाय करू शकता.

खाण्यापिण्याकडे लक्ष द्या
एक्सपर्ट्सनुसार, उन्हाळ्यात खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. तेलकट-तूपट किंवा अत्याधिक मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे. अत्याधिक जंक फूड खाणेही टाळावे. त्याएवजी घरच्या घरी तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करावे. ताजी फळ आणि भाज्यांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात फळ आणि रात्रीच्या जेवणात सॅलड असावे.

हाइड्रेट राहा
उन्हाळात शरिरातून अत्याधिक प्रमाणात घाम बाहेर पडतो. अशातच शरिरातील पाणी कमी होऊ लागते. यामुळे उन्हाळ्यात हाइड्रेट राहण्याचा सल्ला दिला जातो. हाइड्रेट राहण्यासाठी तुम्ही पुरेसे पाणी प्या. याशिवाय पाणीदार फळांचेही सेवन करू शकता. फळांच्या माध्यमातून शरिराला पोषण तत्त्वे मिळतात.

सनस्क्रिन लावा
उन्हाळ्याच्या दिवसात सनबर्नच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळेच उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनस्क्रिन जरूर लावा. जेणेकरून अधिक वेळ उन्हात राहिल्यानंतरही सनबर्नचा त्रास होणार नाही. पण प्रत्येक दोन तासांनी सनस्क्रिन लावणे अत्यावश्यक आहे. सनस्क्रिमुळे सूर्याची हानिकारक किरणे त्वचेचे नुकसान करत नाहीत. (Oily Skin Care in Summer)

मॉइश्चराइजर लावा
हिवाळा असो किंवा उन्हाळा, त्वचेवर मॉइश्चराइजर लावावे. उन्हाळ्यात लाइट वेट मॉइश्चराइजर लावावे. यामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होईल. तुम्ही यासाठी जेल किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चराइजरची निवड करू शकता. याशिवाय टोनरचाही वापर करू शकता. यामुळे त्वचेचा पीएच स्तर मॅनेज होण्यास मदत होईल.


आणखी वाचा :
उन्हाळ्यात ‘या’ 4 चुकांमुळे केस गळू शकतात
घामामुळे केसांमध्ये खाज येते? करा हे उपाय
केसांना चुकीच्या पद्धतीने तेल लावल्यास होईल समस्या, जाणून घ्या योग्य पद्धत

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.