जगाचा नकाशा काही वर्षांनी बदलणार आहे. पृथ्वीवर सत्तर टक्के भागात पाणी आहे. पाच महासागरांमधून (ocean) ही पृथ्वी विभागली आहे. मात्र या महासागरामध्ये एका महासागराची (ocean) भर पडणार आहे. ही माहिती आश्चर्यचकीत करणारी आहे. मात्र जगात एक सहावा महासागर तयार होत आहे. यावर गेल्या अनेक वर्षापासून संशोधन सुरु असून आफ्रिकन खंडाचे दोन भाग होऊन तिथे सहावा महासागर (ocean) होण्याचे संकेत संशोधकांनी स्पष्टपणे दिले आहेत.
गेल्या काही वर्षापासून अफ्रिकन देशांमध्ये जमिनीला मोठ्या भेगापडत आहेत. या घटनेचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका, लंडन आणि अफ्रिकेमधूनही अनेक संशोधक आले. त्यांनी या भूगर्भीय घटनेचा अभ्यास केल्यावर हा निष्कर्ष काढला आहे. या संशोधकांच्या मते, आफ्रिकन महाद्वीप दुंभग पावत आहे. त्यामुळे 5 ते 10 दशलक्ष वर्षांत नवीन महासागर (ocean) तयार होणार आहे. या दुर्मिळ भूवैज्ञानिक घटनेमध्ये टेक्टोनिक प्लेट्सचे विभक्त होणे समाविष्ट आहे, परिणामी पूर्व आफ्रिकेमध्ये एक वेगळा खंड तयार होणार आहे.
एक महासागर (ocean) होणे, या घटनेला लाखो वर्षांचा कालावधी लागतो. अफ्रिकन देशांमध्ये ही घटना होण्यास सुरुवात झाली आहे. आता प्रत्यक्षात येथे कधी आणि कुठल्या टप्प्यावर पाणी येईल, याचा अधिक अभ्यास संशोधक करीत आहेत. संशोधकांच्या मते गेली अनेक वर्षे या अफ्रिकन देशांमध्ये अनेक होणा-या घटनांमधून या सहाव्या महासागराच्या (ocean) आगमनाची बातमी समजली आहे. भूवैज्ञानिकांच्या मते यावेळी आफ्रिकेचे दोन तुकडे होण्याचा धोका आहे. मार्च 2023 च्या सुरुवातीला आफ्रिकेच्या मध्यभागी एक फूट पडली. त्याचा आकार सतत वाढत आहे.
जेव्हा ही दरड सापडली तेव्हा त्याची लांबी 56 किलोमीटर होती. आता हे अंतर अधिक वाढले असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा घटना अन्य भागातही होत असल्यानं आफ्रिकेचे दोन भाग होण्याची भीती भूवैज्ञानिकांना वाटत आहे. त्यांच्या मते हे सहाव्या महासागराच्या (ocean) निर्मितीचे कारण असू शकते.
पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीवर प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिणी महासागर (अंटाक्र्टिक) आणि आक्र्टिक असे एकूण पाच महासागर (ocean) आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, समृद्ध आणि वैविध्यपूर्ण भूभाग असलेला आफ्रिकन खंडात आता नव्या महासागराची निर्मिती होत आहे. याबाबत संशोधन करणा-या एका टिमच्या अहवालानुसार, न्यूबियन, सोमाली आणि अरेबियन प्लेट्स एकत्र येत आहेत. त्याचा विस्तार अफार प्रदेशापासून पूर्व आफ्रिकेपर्यंत होत आहे. ही एक घटना अनेक वर्षापासून घडत असेल, कदाचित तिचा कालखंड लाखो वर्षापासूनचा असेल. आता त्याचे परिणाम हे भूभागावर दिसायला सुरुवात झाली आहे.
2005 मध्ये घडलेल्या एका घटनेनं जगाचे लक्ष या बदलाकडे वेधले गेले. 2005मध्ये इथिओपियाच्या वाळवंटात 35 मैल लांबीचा मोठा खड्डा पडला. सुरुवातीला भुकंपानं अशी घटना झाल्याचा अंदाज होता. मात्र या भागात तशाप्रकारचा कुठलाही भुकंप न झाल्याचे स्पष्ट झाल्यावर भूवैज्ञानिकांची टीम या भागात दाखल झाली. त्यांनी केलेल्या संशोधनात प्रथम अफ्रिकन खंडात महासागर (ocean) निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले. यावर असे शक्य नाही, हे सांगण्यात आले. आणखीही काही भूवैज्ञानिक या भागात दाखल झाले. मात्र या सर्वांच्या अभ्यासावरुन आफ्रिकन खंडाच्या विभक्त होण्याचे संकेत स्पष्टपणे देण्यात आले.
==========
हे देखील पहा : भारतातील या राज्यांमध्ये राहतात फक्त श्रीमंत नागरिक, एकही गरीब व्यक्ती आढळणार नाही
==========
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, एकेकाळी अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका एकाच महाखंडात होते. नंतर ते सर्व नैसर्गिक घटनांमुळे वेगळे झाले. अशाच एका घटनेमुळे भारतही आफ्रिकेपासून वेगळा झाल्याचा निष्कर्ष आहे. भारताची आशियाशी टक्कर झाली तेव्हा हिमालय पर्वत रांगा तयार झाल्या. भूगर्भशास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की 5 ते 10 दशलक्ष वर्षांत टेक्टोनिक्समुळे आफ्रिकन महाद्वीप दोन भागात विभाजित होईल आणि एक नवीन महासागर (ocean) खोरे तयार होईल. पाण्याचा हा नवीन होणारा साठाही अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे.
पाण्याच्या या नवीन साठ्यामुळे तांबडा समुद्र आणि अफार प्रदेशातील एडनच्या आखात आणि पूर्व आफ्रिकन रिफ्ट व्हॅलीला पूर येईल. परिणामी, पूर्व आफ्रिकेचा हा वेगळा खंड होईल. अर्थातच ही सर्व प्रक्रीय जेवढी गुंतागुंतीची आहे. तेवढाच त्याला विलंब लागणार आहे. नवीन महासागराचा (ocean) जन्म ही लाखो वर्षे चालणारी प्रक्रिया आहे. तोपर्यंत अफ्रिकेच्या देशांमध्ये अशा अनेक घटना समोर येणार आहेत.
सई बने