Tanning in summer : उन, धूळ आणि मातीमुळे पाय अस्वच्छ होतात. अशातच पाय बाहेरून आल्यानंतर व्यवस्थितीत न धुतल्यास त्यावर अस्वच्छतेचा लेअर जमा होतो. यामुळे पायांची चमक दूर होते. अशातच आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर टॅनिंगची समस्या वाढली जाते आणि यामुळे अधिकच त्वचा काळवंडलेली दिसते. यासाठी तुम्ही पुढील काही उपाय करू शकता. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….
बटाटा आणि लिंबाचा रस
पायांना बटाटा आणि लिंबाचा रस लावल्याने टॅनिंगची समस्या कमी होऊ शकते. या दोन्ही गोष्टींमध्ये ब्लिचिंग गुणधर्म असल्याने त्वचेचा नैसर्गिक रंग परत येऊ शकतो. बटाटा आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेत त्याचे मिश्रण तयार करून तुम्ही ज्या ठिकाणी त्वचा टॅन झाली आहे तेथे लावू शकता.
दही आणि टोमॅटोचा रस
त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही दही आणि टोमॅटोचा रस वापरू शकता. काळवंडलेल्या त्वचेला चमकदार करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असतात. याशिवाय एक टोमॅटोचा रस घेऊन त्यात दही मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पायांना 25-30 मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे पायांवरील टॅनिंग दूर होण्यास मदत होईल. खरंतर, आठवड्यातून दोनदा दही आणि टोमॅटोचा पॅक काळवंडललेल्या त्वचेवर लावा. (Tanning in summer)
पपई आणि मध
त्वचेवर पपई आणि मधाचा पॅक उत्तम काम करतो. एक कप पिकलेला पपईचा पल्प घेऊन त्यात मध मिक्स करा. हे मिश्रण अर्धा तास तरी टॅनिंग झालेल्या त्वचेवर लावा. यानंतर स्वच्छ पाण्याने पॅक धुवा.
बेसन मास्क
टॅनिंग झालेल्या त्वचेवर बेसनचा मास्क लावू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी तुम्ही दही, बेसन आणि लिंबूचा रस मिक्स करून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट पायांवर 35-40 मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा पायांना बेसनचा मास्क लावल्यास काळवंडलेल्या त्वचेच्या समस्येपासून दूर राहू शकता.