ज्योतिर्लिंगांबाबत स्थानमाहात्म्य सांगणाऱ्या वेगवेगळ्या पौराणिक कथा असल्या, तरी त्यांचा भर शिवमाहात्म्य सांगण्यावर तसेच पार्वतीच्या तपाने साक्षात शिवच त्या त्या स्थानी प्रगट झाला, हे सांगण्यावर असल्याचे सामान्यतः दिसून येते.
मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश – श्रीशैल्य) (Sri Sailam Mallikarjuna Jyotirlinga)
श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन – गुंटकल बेसवाडा – या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुर गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे.
आख्यायिका
रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकरिता (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथे आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले.
भौगोलिक रचना
हैद्राबादपासून सुमारे २१० कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे.
कसे पोहोचाल
हे ज्योतिर्लिंग हैद्राबाद या ठिकाणी असून रेल्वे मार्ग, भू मार्गे या ठिकाणी भाविकांना जाता येते. मुंबई पासून हे अंतर ९७० कि. मी, चेन्नई पासून ५७० कि. मी, बंगळूर पासून ५४० कि. मी, हैद्राबाद पासून २३५ कि. मी आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: बारा ज्योतिर्लिंग – सोरटीसोमनाथ
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.