उत्तराखंड राज्याला देवभूमी म्हटले जाते. उत्तराखंडच्या अनेक भागांचा पौराणिक ग्रंथांमधील कथांमध्ये उल्लेख आहे. या देवभूमीच्या प्रत्येक कणात देवाचा अशं असल्याचेही सांगितले जाते. यात देवभूमीची राजधानी, म्हणजे, डेहराडूनमध्ये चार सिद्ध मंदिरे आहेत. डेहराडूनच्या चार दिशांना स्थापन झालेल्या या मंदिरांमध्ये लक्ष्मण सिद्ध, कालू सिद्ध, मानक सिद्ध आणि मांडू सिद्ध यांचा समावेश होतो. यातील लक्ष्मण सिद्ध मंदिरामध्ये (Laxman Sidh Mandir) प्रभू रामांचे लहान बंधू लक्ष्मण यांनी काही काळ वास्त्यव्य केल्याची माहिती आहे. राम-रावण युद्धात लक्ष्मणांनी मोठा पराक्रम गाजवला होता.
मात्र युद्धात त्यांच्या हातून ब्राह्मणांची हत्या झाली. त्यामुळे प्रभू रामांच्या आदेशानं लक्ष्मणानी या मंदिरात कठोर तपश्चर्या केली. तेव्हापासूनच या सिद्ध मंदिराचे नाव लक्ष्मण सिद्ध मंदिर (Laxman Sidh Mandir) झाले. उत्तराखंडची राजधानी डेहराडून हे अतिशय सुंदर शहर आहे. वर्षाचे बाराही महिने येथे पर्यटकांची गर्दी असते. याच डेहराडूनमध्ये असलेल्या लक्ष्मण सिद्ध मंदिरांचा परिसरही अतिशय नयनरम्य आहे. या मंदिरात मनोभावे पुजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी भत्तांची धारणा आहे. तसेच भगवान दत्तात्रय यांचाही उल्लेख या मंदिराच्या स्थापनेसंदर्भात होतो. भगवान दत्तात्रय आणि लक्ष्मण यांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या मंदिराला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात.
उत्तराखंड राज्यात अनेक मंदिरे आहेत. यातील बहुतांश मंदिरांना पौराणिक वारसा आहे. या मंदिरांची रचनाही वेगळी आहे. रामायण आणि महाभारतातील कथांमध्ये या मंदिराच्या उभारणीबाबत उल्लेख करण्यात आला आहे. यापैकीच एक मंदिर म्हणजे, लक्ष्मण सिद्ध मंदिर. डेहराडूनपासून ऋषीकेश कडे जाणा-या रस्त्यावर साधारण 12 किलोमिटर अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराचा संबंध थेट रामायणाबरोबर आहे. लक्ष्मण सिद्ध मंदिर जिथे आहे, त्या भागात घनदाट जंगल आहे.
त्यामुळे अतिशय शांत आणि सुंदर असणारा हा भाग या मंदिरामुळे पवित्र झाल्याची भावना भक्तांमध्ये आहे. राजधानी डेहराडूनमध्ये 4 सिद्ध मंदिरे आहेत. डेहराडूनच्या चारही दिशांच्या कोपऱ्यांमध्ये ही मंदिरे आहेत. त्यात लक्ष्मण सिद्ध, कालू सिद्ध, मानक सिद्ध आणि मांडू सिद्ध यांचा समावेश आहे. डेहराडूनचे लक्ष्मण सिद्ध मंदिर हे दत्तात्रेय ऋषींच्या चौऐंशी सिद्धांपैकी एक आहे. राम आणि रावणाचे लंकेमध्ये युद्ध झाले. या युद्धात लक्ष्मणांनी मोठा पराक्रम गाजवला. पण त्यांच्या हातून ब्रह्महत्या झाली. त्या हत्येचा दोष दूर करण्यासाठी लक्ष्मण या मंदिरात आले होते. त्यांनी ब्रह्मदेवाच्या हत्येचा दोष दूर करण्यासाठी आणि त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी या मंदिरात काही काळ तपश्चर्या केली. त्यामुळे या सिद्धपिठला लक्ष्मणाच्या नावानंही ओळखले जाते.
या सिद्धपिठाच्या स्थापनेमागे भगवान दत्तात्रय असल्याची माहिती आहे. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या 84 शिष्यांना लोककल्याणासाठी आवाहन केले. या शिष्यांना त्यासाठी सर्व अधिकार दिले. हेच 84 शिष्य 84 सिद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. कार्य पूर्ण झाल्यावर या शिष्यांनी समाधी घेतली. ही समाधी स्थाने सिद्धपीठे किंवा सिद्ध मंदिरे म्हणून ओळखली जाऊ लागली. या 84 सिद्धांमध्ये डेहराडूनमध्ये चार सिद्ध आहेत आणि लक्ष्मण सिद्ध हे त्यातील प्रमुख सिद्धांपैकी एक आहे. लक्ष्मण सिद्ध मंदिर डेहराडून शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर हरिद्वार ऋषिकेश रोडवर आहे. या मंदिरात स्थानिकांची मोठी गर्दी असते, सोबत डेहराडूनला आलेले पर्यटकही या मंदिराला भेट देतात. लक्ष्मण सिद्ध मंदिरात मनोभावे पूजा केल्यास मनातील इच्चा पूर्ण होतात, असे सांगितले जाते. (Laxman Sidh Mandir)
============
हे देखील वाचा : सौदी अरेबियामध्ये दारू पिण्याविरुद्ध कडक कायदे
============
या मंदिरात प्राचीन काळापासून तपश्चर्येच्या ठिकाणी अखंड धूर पेटत आहे. ही अखंड धुनीला कधीच फुंकून प्रज्वलीत करण्यात येत नाही. ती आपोआप प्रज्वलीत होते. याच अग्नीवर तयार केलेले अन्नपदार्थ मंदिरात अर्पण केले जातात. अखंड धुनीतील रक्षा मंदिरात येणारे भक्त प्रसाद म्हणून नेतात. या मंदिरात गूळ, तूप, दही यांचा पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. या मंदिरापासून 400 मीटर अंतरावर एक तलाव आहे. त्याला लक्ष्मण तलाव म्हटले जाते. लक्ष्मणाच्या बाणानं या तलावाची निर्मिती झाल्याची माहिती परिसरातील स्थानिक देतात. या मंदिरात लक्ष्मणाच्या नावानं उत्सवही साजरा केला जातो. तेव्हाही मोठ्याप्रमाणात येथे भाविकांची गर्दी होते.
सई बने