Health Care During Travel : प्रवासादरम्यान आपण फिरण्यामध्ये ऐवढे व्यस्त होतो की, आरोग्याकडे लक्ष देत नाही. याशिवाय प्रवासावेळी आपण योग्य पद्धतीने आहार, पुरेशी झोपही घेत नाही. यामुळे आरोग्य बिघडले जाते आणि ट्रिपची मजा कमी होते. आजारी पडल्याने स्वत:सह दुसऱ्यांना आपला त्रास होऊ लागतो. अशातच प्रवासादरम्यान फिट राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….
जंकफूड ऐवजी हेल्दी फूड खा
प्रवास करताना आपण अधिक जंकफूड खाण्यापासून दूर राहावे. यामुळे तुमची प्रकृती बिघडू शकतो. यामुळे प्रवासादरम्यान तुम्ही जंकफूड ऐवजी हेल्दी फूड खाण्याकडे लक्ष द्यावे,
योगाभ्यासासाठी वेळ काढा
जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा योग्या आणि एक्सरसाइज करत नाही. पण प्रवासावेळी फिट राहायचे असल्यास थोडावेळ स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा योगाभ्यास केला पाहिजे. यामुळे तुम्हाला प्रवासावेळी एनर्जेटिकही वाटेल.
हाइड्रेट राहा
प्रवासादरम्यान वॉशरूमला जावे लागेल या भीतीने बहुतांशजण कमी पाणी पितात. यामुळे शरिरात पाण्याची कमरता निर्माण होते. अशातच शरीर डिहाइड्रेट होते आणि तुम्हाला थकवा जाणवू लागतो. यामुळे हाइड्रेट राहा. यासाठी तुम्ही रसाळ फळं, ज्यूसचे सेवन करू शकता.
नाश्ता करण्यास विसरू नका
प्रवासादरम्यान बहुतांशजण पैसे वाचवण्यासाठी नाश्ता करत नाही. असे केल्याने शरिराला लागणारी उर्जा मिळत नाही. उपाशी पोटी फिरल्याने चक्कर येऊ शकते. नाश्ता केल्याने शरीराला उर्जा मिळाल्यास तुम्ही प्रवासाचा आनंदही घेऊ शकता. (Health Care During Travel)
पुरेशी झोप घ्या
पुरेशी झोप घेतल्याने थकवा दूर होतोच. पण तुम्ही हेल्दी देखील राहता. याशिवाय तुमचा मूड संपूर्ण दिवस उत्साही राहतो.